टॉप न्यूज

बुधवारपासून गावागावात दर्शन

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी तालुके तसंच प्रमुख गावांमध्ये अस्थिकलश ठेवला जाणार आहे. 

शिवतीर्थावर जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झाले. आज सकाळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून अस्थिकलश मातोश्रीवर आणला. यावेळी मातोश्रीच्या परिसरात जमलेल्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा बांध फुटला. आपल्या लाडक्या दैवताचं ज्यांना अंत्यदर्शन घेता आलं नाही अशा गावागावांतील शिवसैनिकांना किमान अस्थिकलशाचं दर्शन घेता यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 

 अंत्यदर्शनासाठी आलेल्या जिल्हाप्रमुखांना मुंबईतच थांबवण्यात आलं असून, अस्थिकलश घेऊनच गावांकडं परतावं, असा त्यांना निरोप देण्यात आला आहे. उद्या (मंगळवार) मुंबईतून अस्थिकलश जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारपासून गावागावांतील शिवसैनिकांना त्याचं दर्शन मिळेल. त्यानंतर अस्थींचं विधिपूर्वक विसर्जन केलं जाईल. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.