टॉप न्यूज

आता रब्बी पिकांसाठीही विमा

यशवंत यादव

कोरडवाहू शेतक-यांना मोठा दिलासा

सोलापूर - रब्बी हंगामातील पिकांसाठी राज्य शासनाच्या कृषी खात्याने नुकतीच पीक विमा योजना जाहीर केली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या योजनेमुळे राज्यातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. यात ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा, उन्हाळी भुईमूग व भात या पिकांचा समावेश आहे.

20 टक्क्याहून अधिक पिकाचे नुकसान झाल्यास सात हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. विमा संरक्षणासाठी बॅंकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. दुष्काळ, कीड व रोग प्रादुर्भाव, पूर, अतिवृष्टी, वीज कोसळणे, आग, चक्रीवादळ यामुळे होणा-या रब्बी पिकाच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण लागू राहील.

रब्बी पीक विमा (रुपये प्रति हेक्टर, 100 टक्के संरक्षणानुसार)

पीक   विमा संरक्षणशेतक-यांनी भरायचा हप्ता

बागायती गहू       17000255

जिरायती गहू      7000105

बागायती ज्वारी    13700274

जिरायती ज्वारी    8000160

हरभरा      17900358

करडई      11900238

सूर्यफूल      19600393

उन्हाळी भुईमूग    44800896

उन्हाळी भात      22800456

कांदा      12530013720

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.