टॉप न्यूज

तीन हजार रुपयांवर शेतकरी संघटना ठाम

ब्युरो रिपोर्ट

सांगली - साखर कारखान्यांनी जाहीर केलेला अडीच हजारांचा दर अमान्य करीत उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रूपये मिळालीच पाहिजे, यावर सर्व शेतकरी संघटना पुन्हा एकत्र आल्या आहेत. दर मिळेपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर पडू देऊ नका, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आज येथील ऊस परिषदेत केले. यामुळे ऊसदराचे आंदोलन इथू्न पुढं आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

या परिषदेला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदुभाऊ खोत आदी नेते उपस्थित होते. परिषदेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद जोशींनी ही भूमिका मांडली. या आंदोलनाचे सेनापती रघुनाथदादा पाटील असतील कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

नुकत्याच झालेल्या आंदोलनात शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशाची 12 डिसेंबरपर्यंत यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूरला होणाऱ्या सभेला मी उपस्थित राहणार आहे. त्यापाठोपाठ 14 राज्यांतील शेतकरी संघटनेच्या विविध नेतेमंडळींसह मी पंतप्रधनांची भेट घेणार आहे. तसंच राजघाटावर धरणं आंदोलन करणार आहे, असंही जोशी यांनी यावेळी नमूद केलं.  

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.