टॉप न्यूज

पैका देणारं करांदेचं पीक

ब्युरो रिपोर्ट

नवनाथ कोंडेकर, भिवंडी; मुश्ताक खान, रत्नागिरी – कंदपीक असणाऱ्या करांदेची लागवड फायदेशीर असूनही राज्यातील शेतकरी अजून त्याकडे फारसा वळलेला नाही. माहितीचा अभाव आणि द्राक्षासारखा मांडव घालावा लागत असल्यानं त्याकडे दुर्लक्ष होतंय. परंतु कमी काळात, कमी खर्चात आणि कमी कष्टात येणारं हे पीक असून शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी, असं आवाहन कृषीतज्ज्ञ करीत आहेत.

कंदपीक वर्गातील करांदे हे अन्नपिकांना पर्यायी पीक आहे. त्याचे शास्त्रीय नाव बल्बीफेरा आहे. कारंद्याचे  काळा आणि पांढरा असे दोन प्रकार आहेत. जमिनीत तसेच जमिनीच्या वर याची फळे येतात. जमिनीच्या वर फळ लागवडीसाठी मांडव उभारावा लागतो. जून महिन्यात पावसानंतर लागवड करावी. साडेतीन ते चार महिन्यात पीक येतं. कारंदांचा आजचा बाजारभाव 50 ते 60 रुपये आहे, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठातील कंदपिके तज्ञ ए. टी. जडे यांनी दिली. आपण गेली तीन वर्षे करांदे पीक घेत असून ते चांगलेच फायदेशीर ठरल्याचे भिवंडीतील शेतकरी नामदेव म्हात्रे यांनी सांगितले. 

रेसीपी

कापलेले करांदे राखेमध्ये घोळवून ते पातेल्यात आपट्याच्या पाल्यात घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडेपर्यंत अलगद पाणी टाकावे, हे पाणी उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढून टाकावे. पाणी एकूण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मीठ घालावे आणि करांदे शिजवून घ्यावेत. मग हे पूर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवून खायला घ्यावेत. 

करांदे हे मातीने भरलेले असतात. त्यामुळे ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावेत. हे चवीला कडवट असतात. त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात, असे नाही. पण ज्यांना आवडतात ते मागून खातात. 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.