टॉप न्यूज

यशवंतरावांना मान्यवरांची आदरांजली

ब्युरो रिपोर्ट

कराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड इथल्या समाधीस्थळास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदरांजली वाहिली. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा उमा हिंगमिरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सिंचन योजनांसाठी केंद्र सरकारचा निधी तांत्रिक अडचणींमुळं मिळाला नाही. योजना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील. तीच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवपाष्ट्रे इथं झालेल्या कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्र्यांनी देवराष्ट्रे गाव आदर्श म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली.

तसंच यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करण्यासाठी वंचित दुर्लक्षित भागाकडं अधिक लक्ष द्यायला हवं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.