टॉप न्यूज

दापोली झाली 'प्लास्टिक फ्री'!

मुश्ताक खान, दापोली
शहरात शंभर टक्के प्लास्टिक बंदी करून राज्यातली पहिली प्लास्टिकमुक्त नगरपंचायत म्हणून दापोली नगरपंचायत नावारूपाला आलीय. थोडक्यात, `नो प्लास्टिक झोन` म्हणून दापोली शहराची नोंद राज्याच्या नकाशात झालीय, हे त्या शहरासाठी आणि नागरिकांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दापोली नगरपंचायतीच्या या अमूल्य कार्याची दखल घेत पर्यावरण खात्याने राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना `दापोली पॅटर्न` राबवण्याचे आदेश दिलेत.

 

सरकारी पातळीवर एखादी योजना राबवताना राज्यपातळीपासून ते ग्रामपातळीपर्यंत त्या योजनेची अंमलबजावणी होत असते. ही सरकारी योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तिच्यावर कायद्यानं अमलबजावणी होण्याबरोबरच त्यात उत्स्फूर्त लोकांचा सहभागही तितकाच अंतर्भूत असतो. याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुक्त दापोली नगरपंचायत. दापोली नगरपंचायतीनं राबवलेली `प्लास्टिक वापरावरील बंदी`. अर्थातव्यवहारात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर संपूर्णपणं बंद करून कागदी पिशव्यांचा वापर करणं. नगरपंचायतीनं राबवलेल्या या योजनेला दापोलीवासीयांनीसुद्धा उत्स्फूर्तपणं पाठिंबा दिला. त्यामुळंच ही योजना 100 टक्के यशस्वी झाली.

 


plasticपर्यावरणाचं संवर्धन करण्याबरोबरच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी दापोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी `प्लास्टिक बंदी`ची घोषणा केली. उत्स्फूर्तपणं लोकांनी दिलेला सहभाग आणि कायद्यानं; तसंच नियोजनबद्ध रीतीनं योजनेला मूर्त रूप देत अवघ्या १५ दिवसांत दापोली नगरपंचायतीनं प्लास्टिक वापरावर बंदी आणली.

 

या प्लास्टिक बंदीमुळे दापोली शहराच्या स्वच्छतेत नक्की भर पडली असून इथल्या नागरिकांमध्ये एक प्रकारे शिस्त लावण्याचं काम नगरपंचायतीनं केलं आहे. दापोलीच्या या कामगिरीची दखल अगदी मंत्रालयानंही घेतली. पर्यावरण खात्याने राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना प्लास्टिकमुक्त करण्यासाठी `दापोली पॅटर्न` राबवण्याचे आदेश दिले. यानंतर राज्यातल्या २०-२५ नगरपालिकेच्या सदस्यांनी दापोलीचा दौरा काढून इथल्या प्लास्टिक बंदीच्या योजनेची माहिती करून घेतली. कायदा आहे, पण त्याची नीट अमलबजावणी होत नाही, अशी कायम ओरड होत असते. पण दापोलीनं हे शक्य करून दाखवलं. त्यामुळंच याची दखल घेण्यास राज्य सरकारला भाग पडलं.

 

plastic5प्लास्टिक बंदीमुळे दापोलीतील कचऱ्याचाघाणीचा प्रश्न तर सुटलाय. संपूर्ण व्यवहारात कागदी पिशव्यांचा वापर होऊ लागल्यानं इथल्या कागदी पिशव्या बनवणाऱ्या व्यवसायाला बरकत प्राप्त झालीये. शिवाय इथल्या बचत गटांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. दापोलीत प्लास्टिकचा वापर करण्यावरील बंदी गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीरीत्या राबवली गेली आहे. योजना बनवणंती यशस्वी करणं याचबरोबर ती योजना कायमस्वरूपी पूर्णत्वास नेणं हे एकट्यादुकट्याचं काम नाहीयेतर त्यात सरकारी यंत्रणा राबवण्याबरोबरच नागरिकांची मानसिकता त्यासाठी तयार होणं अत्याआवश्यक आहे. तरच ती योजना पूर्णपणं यशस्वी होते.

 

आता प्लास्टिकमुक्त दापोली ही योजना यशस्वी झालीय. पण नगरपंचायतीसमोर खरं आव्हान आहे ते ही प्लास्टिक बंदी कायम राबवण्य़ाचं. हे शक्य आहे...पण त्यासाठी हवंय हे आव्हान पेलण्याचं एकत्रित मानसिक बळ.

 

Comments (12)

  • thanks Bandu Dhotre

  • सर्व दापोलीकरांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन...!

  • Guest (एना काले)

    रामदास कोकरेसाहेब यांचा कामाला सलामन! साहेबांचे अनुकरण इतर अधिकारय्नी केले तर आदर्ष भारत
    निर्माण होइल .......

  • सर तुमचं औसाचं कार्य अत्यंत अभिनंदनास्पद आहे.

  • तुमच्या गावातल्या काही समस्या असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्याला वाचा फोडू...

Load More

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.