टॉप न्यूज

कृषी प्रदर्शनात सहा लाख शेतकरी

शशिकांत कोरे

सातारा - कराड येथील आयोजित यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला गेल्या चार दिवसांत सुमारे सहा लाख शेतकऱ्यांनी भेट दिली. यावर्षीचं पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ठरलं.

या कृषी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य होतं सातारा जिल्हा कृषी विभाग, पणन विभाग आणि राज्य वखार महामंडळाचे स्टॅाल. कोणतीही नवी योजना राबवताना केंद्र सरकार सातारा जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करतं. यामुळं शेतकरी वर्गास कृषीबाबतच्या विशेष सरकारी योजनांची जास्त माहिती मिळते.  

उच्च तांत्रिक शेती करण्यात सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे सुमारे 290 ग्रीन हाऊसमधून ढोबळी मिरची, जरबेरा, इंग्लिश भाज्या इत्यादी उत्पादनं घेतली जातात. त्यांचा समावेशही या प्रदर्शनात होता. पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यात हायटेक शेती कशी करावी, यांची माहिती घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत होते.

राज्य वखार महामंडळातर्फे राज्यात 170 वखार केंद्रं असून 800 गोदामं आहेत. त्यांची साठवणूक क्षमता 15 लाख मेट्रिक टन आहे. आता हब आणि स्पोक मॅाडेलमार्फत शेतमालाचं व्यवस्थापन व मार्केटिंग गावस्तरावर करण्याचं नियोजन वखार महामंडळातर्फे करण्यात येत आहे. या व अशांसारखा अनेक विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनामुळं मिळाली.

 


Comments (1)

  • Guest (शशि kore)

    थैंक्स.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.