टॉप न्यूज

दारणातून अखेर पाणी सोडलं

ब्युरो रिपोर्ट

नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या नाशिकमधल्या दारणा धरणाच्या पाणी सोडण्याच्या वादावर अखेर पडदा पडलाय. धरणातून आज सकाळीच तीन टीएमसी पाणी सोडायला सुरुवात झाली. तांत्रिक अडचणींमुळं पाणी सोडण्यास उशीर झाल्याचं अधिकारी सांगत असले तरी आंदोलकांच्या धाकामुळंच पाणी सोडायला विलंब झाल्याची चर्चा आहे.

पण मराठवाड्याला पाणी देण्यावरुन सुरू झालेल्या वादावर आज अखेर पडदा पडलाय. 

धरणातून सकाळी साडेसहालाच पाण्याचं पहिलं आवर्तन जायकवाडीसाठी सोडण्यात आलं. प्रशासनाच्या वतीनं पाणी कालच सोडण्यात येणार होतं. मात्र आंदोलकांच्या धाकानं पाणी सोडण्यात विलंब करण्यात आला. गुरुवारी झालेल्या आंदोलनात अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र आज पोलिसांच्या बंदोबस्तात आणि अधिकाऱ्यांच्या निगराणीत जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं. सलग पाच दिवस पाणी सोडल्यानंतर तीनपैकी अडीच टीएमसी पाणी जायकवाडीला पोचण्याची शक्यता आहे. काल शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं पाणी सोडता आलं नाही. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिकच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाण्याचा थेंबसुद्धा देणार नसल्याची भूमिका घेतल्यानं प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. नगरमध्ये झालं तसंच आंदोलन नाशिकमध्ये होणार असल्यानं प्रशासनासोबतच पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता. अखेर दारणातून भल्या सकाळीच पाणी सोडल्यानं आता आंदोलकांची पुढची भूमिका काय असणार, याकडंच सर्वांचं लक्ष लागलंय. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.