टॉप न्यूज

मराठवाडा तहानेनं व्याकूळलाय...

विवेक राजूरकर

औद्योगिक वसाहतींना फटका

विवेक राजूरकर

वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद - मराठवाड्यात यंदा अत्यंत तुरळक पाऊस झालाय. त्यामुळं मागील दोन दशकात पहिल्यांदाच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. औरंगाबादपासून केवळ दहा किलोमीटरवर असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील गावकऱ्यांना तहान भागवायलाही पाणी नाही. विशेष म्हणजे, हे गाव एमआयडीसी बजाजनगर परिसरात आहे. येथील औद्योगिक वसाहतीलाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसला असून अनेक उद्योगधंदेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जवळपास संपूर्ण मराठवाड्यात अशीच परिस्थिती आहे.

वडगाव कोल्हाटीकरांच्या घशाला कोरड

वडगाव कोल्हाटीत पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तेही १५ ते २० मिनिटं. त्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला एक कळशीभर पाणी येतं. गावाजवळच असलेल्या तलावाची दुर्दशा झालीय. या डबकंसदृश तलावावर दोन किलोमीटरची पायपीट करत महिला येतात, पण येथेही फक्त पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहिरीची भूजल पातळी तर एकदम खोल गेलीय. त्यामुळं सध्या तरी टॅंकरचाच आधार आहे. नेतेमंडळींना महिलांच्या रोषाला अनेकदा सामोरं जावं लागलंय. त्यामुळं ते आता गावात फिरकेनासे झालेत. यामुळं आता आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. केवळ वडगाव कोल्हाटीच नव्हे तर औरंगाबादच्या फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर, कन्नड, खुल्ताबाद, गंगापूर या तालुक्यात आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत अशीच भीषण परिस्थिती आहे. 

नऊ टीएमसी पाणी कधी मिळणार?

राज्य सरकारनं मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे आणि भंडारदरा तसंच नाशिकच्या दारणा धरणातून नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जे राजकारण सुरू झालंय, त्यामुळं मराठवाड्यातील जनतेत असंतोष खदखदतोय. खरं तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ अन्वये समन्यायी पाणीवाटपानुसार मराठवाड्याच्या वाट्याला २७ टीएमसी पाणी यायला हवं, असं जाणकारांचं मत आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.