टॉप न्यूज

पवारांना वाटतं शेतकरी होईल इतिहासजमा

ब्युरो रिपोर्ट

ठाणे - राज्यात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), तसंच छोट्या-मोठ्या उद्योगांचं जाळं असलेला ठाणे आणि रायगड जिल्हा आता विकासापासू्न लांब ठेवा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलीय. अर्थात, यामागे शेतकऱ्यांचा कैवार हीच त्यांची भूमिका आहे. 

शरद पवार यांच्याच नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या दहा वर्षांत उद्योगांसाठी या दोन जिल्ह्यांतील जमिनी घेण्याचा सपाटा लावलाय. त्यामुळं तेथील शेतकरी इतिहासजमा होण्याची भीती स्थानिक नेतेमंडळींना वाटतेय. ती खरी असल्याची खात्री पटल्यानं पवारांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळवलाय.  विकास झाला पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु ठाणे आणि रायगड सोडून उर्वरित महाराष्ट्रात विकासाची गंगा न्या, इकडं बास झालं आता, असं सांगताना याबाबत आता एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलंय.  

डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सवाचं उद्घाटन काल (रविवार) शरद पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह आगरी समाजातील नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.  

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असल्यानं ठाणे आणि रायगड जिल्ह्यात झपाट्यानं उद्योगांचं जाळं उभं राहिलं. सेझमुळं तर जमिनी अधिग्रहण करण्याचा सपाटाच सरकारनं लावला. त्यामुळं शेतीखालील जमीन झपाट्यानं कमी झाल्यानं शेतकरी उघड्यावर आला. हे ज्यावेळी घडत होतं, त्यावेळी त्याला पूरक भूमिका घेत शरद पवार शेतीवरचा भार कमी करा, असं सांगत राज्यभर शेतकऱ्यांचं प्रबोधन करीत होते. आजही त्यांची तशीच भूमिका आहे. आता उद्योगांसाठी जमिनी गेल्यानं मोठ्या संख्येनं शेतकरी उघड्यावर येतोय. जोडीला धरणग्रस्तांचा प्रश्न बाकी आहेच. त्यामुळं विकासाच्या प्रक्रियेत शेती आणि शेतकरी यांच्या हिताचा विचार प्राधान्यानं केला पाहिजे, असं त्यांनी सूचित केलंय. 

शरद पवारच सांगायचे......

देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोक शेतात काम करतात. (आणि त्यातही ४० टक्के लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळतं.) सवलती घेऊनही शेताचं उत्पादन वाढत नाही.  देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षांत दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही.  धान्याबरोबरच या देशाला इतर साधनसामग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडं नसल्यानं या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर औद्योगिक कामाकडे वळवले, तर देशाची परिस्थिती सुधारेल. 

 


Comments (1)

  • Guest (अविनाश)

    For the past hundred years, dams, which have been constructed in the rural areas of Thane and Raigad districts to supply water to Mumbai, destroyed the lives and livelihoods of Adivasis and farmers . It criticised the “skewed policies of the government, which displaced Adivasis while providing the mega-cities of Mumbai-Thane and its suburbs with an uninterrupted supply of water from these dams.” हीच पारिस्थि राहिली टार शेतकरी रहीतरी कसा .प्रकल्प हवेत पण शेत्कारय चा पण विचार कयाला हवा सरकारने

    http://www.thehindu.com/news/national/article3388388.ece

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.