टॉप न्यूज

पश्चिम घाट अहवाल लोकांपुढं मांडा

मुश्ताक खान

गैरसमज कोण पसरवतंय ते लोकांना समजेल : डॉ. माधव गाडगीळ 

मुश्ताक खान, महाबळेश्वर – पश्चिम घाट अहवालामध्ये जे नाही ते सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. अहवालावर लोकशाही मार्गानं चर्चा व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. सोप्या मराठी भाषेत अहवाल तयार करून तो लोकांपर्यंत न्या. त्यामुळं गैरसमज कोण पसरवतंय ते लोकांना समजेल आणि लोकांनाच काय करायचं ते ठरवू दे, असं हा अहवाल तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉ. माधव गाडगीळ यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलंय.

पश्चिम घाट अहवालावरून सध्या जोरदार वादंग सुरू आहे. अहवालामुळं कोकणाचा विकास ठप्प होईल, असा आरोप होतोय. मुख्यमंत्र्यांनीही विरोधी भूमिका घेतलीय. त्यातच गाडगीळांना व्याख्यानासाठी आमंत्रण दिलेल्या रत्नागिरीच्या संस्थेला धमकी आल्यानं त्यांनी व्याख्यान रद्द केलंय. त्यामुळं अहवालाचा हा मुद्दा आता गुद्द्यावर आलाय. या पार्श्वभूमीवर गाडगीळांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना आपली सविस्तर भूमिका मांडली. 

बीटी बियाण्यांमुळं शेतकऱ्यांना जास्त फायदा झाल्याचं उदाहरण जगात कुठंही आढळत नाही. निसर्गत: होणाऱ्या परागीकरणाला खीळ बसून बियाण्यांच्या मूळ उपयुक्त जातीच नष्ट होत असल्यानं मेक्सिकोमध्ये त्यावर बंदी घालण्यात आलीय. म्हणूनच मूळ बियाणं वापरून सेंद्रीय शेती करण्याला प्राधान्य द्या, असं अहवालात म्हटलंय. त्यामुळं उत्पन्न कमी होणार नाही. धान्यापासू्न जी दारूनिमिर्ती केली जाते, ती बंद करा, असा उपाय गाडगीळांनी सुचवलाय. खाणींबाबत बेबंदशाही नको. गोव्यातील खाणी त्यामुळंच बंद पडल्यात, असंही त्यांनी सांगितलं.    

निसर्गाला आणि मानवी जीवनाला जे जे अनुकूल आहे, ते ते या अहवालात सुचवलंय. हा  अहवाल शंभर टक्के स्वीकारावा, याचा अर्थ तो लोकांपुढं ठेवावा. लोकशाही मागानं चर्चा व्हावी, आणि त्यावर लोकांना निर्णय घेऊ दे. त्यामुळं त्यांना प्रकल्प इथल्या लोकांवर लादता येणार नाही. तसंच मंत्रालयात बसून आपला अजेंडा राबवता येणार नाही. मुंबईत एसीमध्ये बसून तुम्ही निर्णय घेणार असाल तर ते चुकीचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 


Comments (2)

 • Guest (Avinash)

  खुप चन इंटरव्यू स्पष्ट स्ट्रैट फॉरवर्ड विषयाला धरून, असेच धड़दिचे काम करत रहा, बेस्ट ऑफ़ लक मुश्ताक. फ्रॉम अविनाश रामचंद्र Wagh

 • Guest (कोल्सेपतिल बी जी)

  काल ता.२१।११।२०१२ रोजी सकाळी ७:३० वाजता अजमल कसाबला पुणे येथील येरवडा तुरंूगात फाशी दिल्याने देशांत फटाके वाजवून दिपावळी साजरी केल्याचे आंपण पाहिले.याकामी तपास यंत्रणा,न्याय यंत्रणा,राज्य व केंद्र सरकार व राष्ट्रपति या सर्वांचे कौतुकच करायला हवें. ते देशाने केलेलेच आहें.एखाद्या रोगांवर उपचार करणे व त्यांच रोगांवर प्रतिबंधक उपाय करणे यांत जमिन-अस्मानाचे अंतर असते. कसाबला फाशी हा आतंकवाद नांवाच्या रोगांवर उपचार झाला,मलमपट्टी झाली.ती तर तात्पुरती असते.
  २६।११।२००८ च्या हल्ल्याची दूसरी बाजू अभ्यासल्यास  हा हल्लाच मुंळी टाळता आला असतां असे त्या वेळच्या सर्व वर्तमानपत्रांतील बातम्यावरून स्पष्ट दिसते. त्यांत मुख्यता "सकाळ"ता.३।१२।२००८ आणि
  The Times Of India Pune,December 1,3,The Indian Express Pune December 3 Mumbai,December 15,26 Hindustan Times,Mumbai December 11,24 (2008 )& Jan 10(2009)विस्तार भयासाठी या सर्व बातम्या  येथे देणे अशक्यच.
   या सर्व बातम्या काय सांगतांत?१८।११।२००८ ला अमेरिकेने आपल्या RAW ला कळविले होते कीं LeT ship भारतीय समुद्रांत प्रवेश करीत आहें.अक्षांश-रेखांश व त्याचा वेग देखील कळवला होता.RAW ने ही माहिती 
  १९।११।२००८ला IBला देखील कळविली होती. The Joint Director IB, प्रभाकर आलोक यांनी तीच पुढे
  Naval Headquarters ( through the Principal Director Naval Intelligence )  व Coast Guard यांना २०।११।२००८ ला कळविली होती. तसेच RAW ने IB ला LeT वापरीत असलेल्या ३५ मोबाइल नं. ची यादी २१।११।२००८ ला दिली व त्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते.मुंबई पोलिसांना देखील याकडे लक्ष द्यायला सांगितले होते.असे जे येथे विस्तारपूर्वक मांडता येईल ते तुम्ही आतां स्वतः अभ्यासू शकतां.
  प्रश्न वरील गुढ देशापुढें खुले करणे हे सरकारचे व या सर्व गुप्तचर संस्थाचे कामच आहें.हा आमच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला व त्यांत आमचे मारले गेलेले बांधव याची देशांतील नागरिकांना चिंता आहें.ती कोण दूर करणार?यासाठी एक उच्च स्तरीय समिति नेमून या देशाला खरं काय घडलं ते कळेल काय?

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.