टॉप न्यूज

गावोगावी दिसणार बडे बडे ब्रँड

ब्युरो रिपोर्ट

अखेर एफडीआयचा प्रस्ताव लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालाय. त्यामुळं आता रिटेल क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. आता जगभरातील अनेक बड्या कंपन्याची स्टोअर्स भारतातील सर्व शहरांमध्ये दिसू लागतील. या कंपन्यांची ही थोडक्यात ओळख...

 

1. देशातील रिटेल क्षेत्रातली वार्षिक उलाढाल सध्या 500 अब्ज डॉलरवर पोहोचलीय. या क्षेत्रात अजूनही पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचं 90 टक्के वर्चस्व आहे.

2. रिटेलमध्ये सध्या बड्या कंपन्यांचं अस्तित्व केवळ 10 टक्के आहे. वर्षअखेर हे  प्रमाण 20 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. नव्यानं सुरू झालेले शॉपिंग मॉल आणि वाढत्या मध्यम वर्गाचा हा परिमाण आहे. 

3. एफडीआय निर्णयाचा परिणाम छोट्या किराणा दुकानदारांवर होणार आहे. हे दुकानदार 0 निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांची महत्त्वाची व्होट बँक आहे. त्यामुळं या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केलाय. 

देशातील बड्या रिटेल कंपन्या 

फ्युचर ग्रुप

पँटालून रिटेल्स - ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचे पँटालून स्टोअर्स, बिग बाजार हे मोठे ब्रँड आहेत. या ग्रुपचे देशभरात 500 स्टोअर्स आहेत. फ्रान्सची आघाडीची कंपनी 'कॅफो'सोबत त्यांनी हायपर मार्केटमध्ये भागीदारी केलीय. या कंपनीचा वार्षिक फायदा 2011अखेर 1.42 अब्ज रुपयांवर पोहोचलाय. 

रिलायन्स इंडस्ट्रीज 

मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल्स ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. रिलायन्स रिटेल्सचे देशभरात 1050 स्टोअर्स आहेत. मात्र कंपनीला 2011ला तोटा सहन करावा लागलाय.  

शॉपर्स स्टॉप 

के. रहेजा ग्रुपची 'शॉपर्स स्टॉप' ही देशातील रिटेल्समधील तिसरी मोठी कंपनी आहे. कंपनीच्या देशातील स्टोअर्सची संख्या 644 आहे, तर 12 हायपर मार्केट आहेत. 

ट्रेन्ट

ही कंपनी टाटा ग्रुपची आहे. या कंपनीचे देशभरात 72 स्टोअर्स आहेत. वेस्टसाईड हा कंपनीचा प्रमुख ब्रँड आहे. इंग्लंडच्या टेस्को आणि 'स्टार बाजार'सोबत कंपनीनं नुकतीच भागीदारी केलीय. ट्रेन्टनं 2011मध्ये 74 कोटींचा निव्वळ नफा कमावलाय. 

आदित्य बिर्ला ग्रुप

या ग्रुपचे  कुमार मंगलम बिर्ला यांनीही 'मोर' या ब्रँडमधून रिटेल क्षेत्रात प्रवेश केलाय. त्यांची देशभरात 580 स्टोअर्स आहेत. 

बड्या विदेशी कंपन्या 

वॉलमार्ट

अमेरिकेतील 'वॉलमार्ट' हे रिटेल क्षेत्रातील बलाढ्य नाव. जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये वॉलमार्टचा तिसरा क्रमांक लागतो. तर रिटेलमध्ये पहिला क्रमांक असेलल्या कंपनीची जगभरातल्या 27 देशांत 10 हजार स्टोअर्स आहेत. त्यामध्ये 22 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीनं सध्या 'भारती एन्टरप्राईजेस'सोबत (एअरटेल) भागीदारी करत भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केलाय. वॉलमार्टची देशात सहा मोठे स्टोअर्स सुरू झालीत.  

टेस्को

इंग्लंडमधील ही सर्वात मोठी तर जगातील तिसरी मोठी रिटेल कंपनी आहे. अमेरिका ते थायलंडपर्यंत या कंपनीचे 14 देशांत 6 हजार 351 स्टोअर्स पसरलेत. त्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या त्यांनी स्टार बाजारसोबत भागीदारी करत भारतात व्यवसायाला सुरुवात केलीय. आता या कंपनीचं होलसेल मार्केट लक्ष्य आहे.  

कॅफो

ही फ्रान्सची रिटेल क्षेत्रातील मोठी कंपनी, तर जगातील रिटेल क्षेत्रातील दुसरी बडी कंपनी आहे. कंपनीची स्टोअर्स युरोपपासून सौदी अरेबिया ते आफ्रिकेपर्यंत पोहोचली आहेत. 2009मध्येच कंपनीनं जगभरात 1 हजार 395 हायपर मार्केट उघडली. या कंपनीनं नवी दिल्लीत सध्या दोन स्टोअर्स उघडलेत. या कंपनीचा हायपर आणि सुपमार्केट स्टोअर्समध्ये उतरण्याचा मानस आहे.

मेट्रो एजी 

जर्मनीची ही कंपनी उत्पन्नाच्या दृष्टीने जगातली पाचवी मोठी रिटेल कंपनी आहे. सध्या त्यांची भारतात सहा होलसेल स्टोअर्स आहेत. येत्या वर्षात देशात कंपनीची चार नवी स्टोअर्स सुरू होतील. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.