टॉप न्यूज

नामांतराचं राजकारण...

रणधीर कांबळे

मुंबई - शिवाजी पार्कचं शिवतीर्थसं नामांतर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसनं त्याला आतापासूनच विरोध करायचं ठरवलंय असं दिसतंय. शिवाजी पार्कचं नाव बदलण्याचा प्रयत्न म्हणजे शिवाजी महाराजांचं नाघेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला आता शिवाजी महाराजांच्या नावाची गरज संपलीहेच निदर्शनासयेत असल्याचाही आरोप काँग्रेसनं केलाय.

१९२७ मध्येब्रिटिशांनी शिवजयंतीच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं या मैदानाला शिवाजी पार्क हे नाव दिलं होतंआता शिवसेनेनं बौध्दिक दिवाळखोरी दाखवून ११ कोटी जनतेची अस्मिता दुखावू नये आणि शिवाजी पार्कचं शिवतीर्थ हे नाव बदलून इतिहासाला ठाकरे घराण्याकडं वळवू नये, असं आवाहनही काँग्रेसनं केलंय. यातून आता हेच स्पष्ट होतंय की, काँग्रेस आणि शिवसेनेला आता शिवाजी पार्कच्या नामांतराच्या प्रश्नावरून रान उठवायचं आहे. हे वाद उठतील, नाव बदलेल किंवा नाव तसंच राहीलही.यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे इथल्या सामान्य माणसाला शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य हवं आहे, याचा विसर मात्र काँग्रेस-शिवसेनेला पडलेला दिसतोय. खरं पाहता भावनेचं राजकारण करण्यालाच सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही रस असल्याचं यातून दिसतंय.

मूलभूत गरज असलेला स्वयंपाकाचा गॅसही स्वस्त दिला जात नाहीये, पेट्रोल महागलंय, धान्यांच्या किमती वाढताना दिसताहेत, महागाईचा वाढत चाललेला हा आलेख रोखावा, असं कुणालाही वाटत नाही. सगळेच पक्ष आपापलं राजकारण करण्यात गुंतलेले आहेत.पण सामान्य माणसाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रणकंदन माजलंय, असं चित्र काही दिसत नाहीये.त्यामुळं सामान्य माणूसही या सर्व राजकारणात आपली जागा शोधतोय, पण ती त्याला सापडत नाही. म्हणूनच या सामान्य माणसाच्या मनात राजकारणाविषयी चीड वाढताना दिसतेय. हीचीड जर कमी करायची असेल तर सामान्य माणसाचं जगणं सुखकर होण्यासाठी राजकारणाचा रोख असायला हवा. हे चित्र जेव्हा बदलेल तेव्हा हा सामान्य माणूस त्याच्या वंदनीय अशा प्रतीकांच्या पुतळ्यांच्या किंवा नामांतराच्या लढाईत मनापासून सहभागी होईल. त्यासाठी मग एकेरीची भाषा कुठल्याच पक्षाच्या तोंडून येणार नाही. शिवाजी महाराजांसारखी जी काही प्रतीकं आहेत, त्यांच्या मनातलं रयतेचं राज्य आजचे राजकारणी करणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे.
….........................


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.