टॉप न्यूज

सोयाबीन, कापसासाठी मोर्चा

ब्युरो रिपोर्ट

नागपूर-  विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. या अंतर्गत भाजपतर्फे गोंदिया आणि वर्ध्यावरून विविध रॅली काढण्यात आल्या असून, मंगळवारी या दोन्ही रॅली नागपूर विधानसभेला धडक देणार आहेत. 

धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी गोंदियावरून भाजपची सायकल रॅली रवाना झाली. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय. ही सायकल रॅली दरमजल करत मंगळवारी विधानसभेला धडक देणार आहे. 

धान पिकाला २५०० रुपये प्रती क्विंटल उत्पादन खर्च येतो, असं केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं सांगितलंय. मात्र तरीही सरकारनं धानाला केवळ १२५० ते १२८० रुपये प्रति क्विंटल एवढी आधारभूत  किंमत दिलीय. त्याचबरोबर आघाडी सरकार राज्यात 132 औष्णिक विद्युत प्रकल्प आणणार आहे. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची ९० हजार एकर शेतजमीन जाईल आणि प्रकल्पांलगतची शेतजमीन  नापीक होईल, या विरोधात ही सायकल रॅली काढण्यात आल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलंय. या सायकल रॅलीत 200 युवक सहभागी झाले असून रॅलीचा पहिला मुक्काम भंडाऱ्यात असणार आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्ध्यातूनही भाजप कार्यकर्त्यांनी वर्धा ते नागपूर या पदयात्रेस सुरुवात केलीय. विनोबा भावे यांची कर्मभूमी पवनार इथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. मंगळवारी ही पदयात्रा नागपूर विधानसभेला धडक देणार आहे. 

कापसाला सहा हजार रुपये, तर सोयाबीनला पाच हजार प्रती क्विंटल भाव द्या; तसंच एफडीआय त्वरित रद्द करा, या आंदोलकांच्या विविध मागण्या आहेत. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.