टॉप न्यूज

समर्थ कारखान्याला पुरस्कार

ब्युरो रिपोर्ट

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सहकारी उत्कृष्टता पुरस्कार जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात शनिवारी आयोजित शानदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून कारखान्याचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

एक लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषीमंत्री शरद पवार आणि राज्यमंत्री डॉ. चरणदास महंत हे उपस्थित होते. 

समर्थ साखर कारखान्यासोबतच आसाममधील दक्षिण रामपूर गाव, आणि आंध्रप्रदेशातील मुलूकानूर महिला सहकारी डेअरीला हा पुरस्कार मिळालाय. याशिवाय राज्य उत्कृष्टता पुरस्कार विविध राज्यातील 24 संस्थांना मिळाले आहेत. या पुरस्काराचं स्वरुप 50 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असं आहे. 

समर्थ सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1982 मध्ये झाली. या कारखान्याची एकूण सभासद संख्या 8 हजार 77 असून त्यात 2 हजार 713 मागासवर्गीय आणि महिला आहेत. कारखान्यात डिस्टीलरी युनिट, जैव उर्वरक सयंत्र, खत, शुगर बीट सयंत्र, वीज निर्मिती प्रकल्प आहे. 2009-10 या वर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ पुणेतर्फे दिला जाणार उत्तम वित्त व्यवस्थापन पुरस्कारही समर्थ साखर कारखान्याला मिळाला आहे. 

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. सहकाराच्या क्षेत्रात आपल्या देशाला शंभर वर्षाचा इतिहास आहे. आपला सामाजिक आणि आर्थिक विकास हा सहकाराचा मार्ग स्वीकारल्यानंच झाल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.