टॉप न्यूज

विरोधकांचा मूक मोर्चा

ब्युरो रिपोर्ट

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर भाजपचा मूकमोर्चा धडकला. भाजपच्या आमदारांनी विधानसमंडळाच्या आवारातच मूकमोर्चा काढत आघाडी सरकारचा निषेध केला. अजित पवार यांचा जलसिंचन भ्रष्टाचार, कापूस, महागाई आणि भ्रष्ट्राचार या मुद्यावर आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप करत भाजप नेत्यांनी यावेळी निषेध केला. 

भाजप आमदारांनी विधानसभेच्या आवारात काळे झेंडे आणि बॅनर फडकवून आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.  अजित पवार यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यापासून विरोधक आक्रमक झालेत.  भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून अजित पवार यांची सुटका करण्यासाठीच त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लावण्यात आल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय. 

या आंदोलनात मनसेचे आमदारही काही वेळ सहभागी झाले होते. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे, विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीसह सर्वच आमदार सहभागी झाले होते.  उद्या विधानसभेवर गोंदियाहून सायकल मोर्चा तर वर्ध्यावरुन निघालेली पदयात्रा धडकणार आहे. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.