टॉप न्यूज

फायदा असेल तर स्वागत

राहुल विळदकर

अहमदनगर – आम्हाला जर फायदा होत असेल तर एफडीआयला आमचा विरोध नाही.  मालाची विक्री करण्यासाठी आम्हाला बाजार बांधून दिला तर नक्कीच आम्हाला सोयीचं होईल. बाहेरच्या कंपन्यांना भाजी देण्यास आमची कोणतीच हरकत नाहीये. शेवटी आम्हाला फायदा हवाय, या प्रतिक्रिया आहेत, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या. 

केंद्र सरकारनं एफडीआय विधेयक मंजूर केल्यानं आता किरकोळ विक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालायं.  त्यामुळं शेतकऱ्याचं भलं होणारं का, याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया. होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या प्रातिनिधिक म्हणाव्या अशाच आहेत.

एफडीआयलासुद्धा आडते नेमावे लागणारच आहेत,  मग सरकार आम्हालाच चोर का ठरवतंय?  इथं शेतकरी आणि आमच्यातले जुने संबंध तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. हे होत असतानाच सरकार मात्र मल्टिनॅशनल कंपन्यांना का पायघड्या घालतंय, असा व्यापाऱ्यांचा सवाल आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.