टॉप न्यूज

देशभरातील शेतकरी मोशीत

ब्युरो रिपोर्ट

पुणे - भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकीक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन आजपासून मोशीत सुरू झालंय. प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांची इथं एकच झुंबड उडालीय. आतापर्यंत सुमारे 15 हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली असून दिवसअखेर हा आकडा विक्रमी 50 हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

परंपरेला फाटा देत प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्यांदा आलेल्या शेतकऱ्याच्या हस्ते उद्घाटन झालं. पुढारी नसले तरी ढोलताशे, लेझीम, झांज पथकांमुळं उद्घाटन झोकात झालं. प्रदर्शनात 1200 हून अधिक स्टॉल्स असून अत्याधुनिक अवजारं, बियाणं, यांच्यासह शेतीविषयक ज्ञान देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. सिंचनाची तर अनेकविध उपकरणं इथं पाहायला मिळतात. एवढंच कशाला ट्रॅक्टरचे कधी पाहिले नसतील एवढे प्रकार आहेत. त्यामुळंच प्रत्येक शेतकऱ्यानं प्रदर्शनाचा फेरफटका मारलाच पाहिजे, अशा भावना प्रदर्शन पाहून परतणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शिवाजीनगर बसस्थानकापासून प्रदर्शनस्थळापर्यंत खास बसेसची सोय करण्यात आलीय. त्यामुळं परगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. 

विकासाकडं वाटचाल करणारा भारत आणि त्याला पाठबळ देणारा इंडिया, असं नवं चित्र सध्या देशात दिसू लागलंय. या दोघांना जोडणारा पूल 'भारत4इंडिया डॉट कॉम' हे पोर्टल आहे.  शेतकऱ्यांना, त्यांच्या समस्यांना, ग्रामीण भारताला समजावून घेणारं, तिथल्या संस्कृतीची इंडियाला ओळख करून देणारं एक नव्या जगाचं माध्यम, पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क, ही आहे एक 'ग्रासरुट' चळवळ. आपली मुळं शोधायची तर शेतात जायला हवं, गावच्या मातीत जायला हवं. हे गाव, ही माती, ही नाती पाहायला मिळतात, किसान कृषी प्रदर्शनात. म्हणूनच हे प्रदर्शन, त्यात घडणाऱ्या घडामोडी आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. याच ठिकाणी. क्लिक करा आणि अपडेट राहा.

Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.