टॉप न्यूज

विदर्भातील आमदारांची मागणी

प्रवीण मनोहर

नागपूर – राज्याचा गाडा हाकताना विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळून ते सुटावेत, यासाठी नागपूर करारातील तरतुदीनुसार नागपूरला अधिवेशन होतंय. पण गेल्या चार दिवसांपासून सभागृहाचं कामकाज ठप्प झाल्यानं विदर्भातील जनतेतून संताप व्यक्त होतोय. विदर्भातील आमदारांनीही त्याविरुद्ध आवाज उठवत आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. 

या सर्वांचं एकच म्हणनं आहे. कामकाज सुरू करून विदर्भातील प्रश्न सोडवा. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा आजचा विदर्भ मध्य प्रदेशात होता. प्रचंड निसर्गसंपत्ती, काळीशार जमीन, खळाळत्या नद्यांमुळे वऱ्हाडात सुबत्ता नांदत होती, म्हणूनच मोठ्या अभिमानानं म्हटलं जायचं "वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड". विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी विदर्भवादी नेते ब्रिजलाल बियाणी आणि एम. अने यांनी 1953 मध्ये एक करार केला. तो 'नागपूर करार' म्हणून प्रसिद्ध आहे. संयुक्त महाराष्ट्रात जात असताना विदर्भाच्या विकासाकडं दुर्लक्ष होणार नाही यासाठी वर्षातून एकदा सहा आठवड्यांचं अधिवेशन नागपुरात होईल आणि ज्यात फक्त आणि फक्त विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांची सोडवणूक होईल, असं त्यात म्हटलं होतं. त्यानुसार नागपूरला अधिवेशन होत असतं.   

गेल्या चार दिवसांपासून नागपूर कराराचं किती पालन होतंय, असा प्रश्न आता विचारला जातोय.

आमदार बच्चू कडू यांनी तर अधिवेशन नव्हे राजकारण सुरू आहे, असं म्हटलंय. अॅड. यशोमती ठाकूर (काँग्रेस), संजय राठोड (शिवसेना), हरिदास भदे (भारिप बहुजन महासंघ) यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून तशी वेळ आल्यास आंदोलन करण्याचा इशारा 'भारत4इंडिया'शी बोलताना दिला.

काय म्हणाले आमदार...

बच्चू कडू - मोठ्या नेत्यांच्या दादागिरीमुळं सभागृहाचं कामकाज ठप्प झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस, संत्रा, 

सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत.विदर्भातील सर्व विकासकामांबाबत प्रस्ताव आहे. मात्र त्यावर चर्चा झालेली नाही. केवळ 

राजकारण सुरू आहे, अधिवेशन नाही. याचा निषेध म्हणून उद्या अर्धा तास निषेध कार्यक्रम आयोजित केलाय.

यशोमती ठाकूर - विदर्भातील प्रश्नांना न्याय देता यावा, यासाठी नागपूर अधिवेशनाची तरतूद आहे. मात्र अजूनपर्यंत 

आम्हाला एकही वाक्य बोलता आलं नाही. विरोधी पक्षांनी सभागृह चालूच दिले नाही. संविधानानुसार सर्वांनीच जबाबदारीनं 

वागायला नको का?

रवी राणा - विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं गोंधळ घालतायत त्यामुळं विदर्भातील प्रश्नांना वाचाच फुटत नाही. विदर्भातील 

माणूस मोठ्या आशेनं पाहातोय. तेव्हा गोंधळ आवरा आणि कामकाज करा, अन्यथा सोमवारपासून मग विदर्भाची ताकद 

दाखवू.

संजय राठोड - कामकाज बंद होतंय त्याचं दु:ख आहे. एसआयटी चौकशीतूनच सिंचन गैरव्यवहार बाहेर येईल. 

सत्ताधारी म्हणतात चर्चा करा. काय चर्चा करायची? अधिवेशनावर 350 कोटी रूपये खर्च होतात. पण विदर्भातील 

जनतेच्या पदरात काहीच पडत नाही.  

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.