टॉप न्यूज

देशातला पहिलाच ऐतिहासिक प्रयोग

ब्युरो रिपोर्ट

मोशी, पुणे- नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम! देशातलं पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क!! असं बिरुद मिळवलेल्या 'भारत४इंडिया डॉट कॉमनं' मीडियात एक नवा इतिहास निर्माण केलाय. देशातलं सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचं अर्थात 'किसान'चं लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलंय. होमपेजवरील 'किसान Live' वर केल्यावर कृषी प्रदर्शन 'याचि देही याचि डोळा' घरबसल्या, प्रवासात, हातातल्या मोबाईलवर पाहता येईल...

किसान प्रदर्शन 2012 चा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची अलोट गर्दी झालीय. या प्रदर्शनातील विविध घडामोडी तुम्हीही लाईव्ह बघू शकता 'भारत4इंडिया'वर...

होमपेजवरील किसान कृषी प्रदर्शन या विंडोमध्ये आपण आत्तापर्यंतचं 'किसान'चं कव्हरेज बघू शकता. याशिवाय 'भारत4इंडिया'कडून घेण्यात येणाऱ्या शेतकरी सर्व्हेमध्ये सहभागी होऊ शकता.

'भारत4इंडिया' ग्रामीण 'भारत' आणि शहरी 'इंडिया' यांना जोडणारं नव्या युगाचं माध्यम आहे. या माध्यमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 'किसान'मधील 'भारत4इंडिया'च्या स्टॉलवर तर शेतकरी गर्दी करत आहेत. प्रत्येकाला या माध्यमाविषयी उत्सुकता आहे. प्रत्येकाला या माध्यमाशी जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मातीशी नाळ जपलेल्या शहरी मंडळींनाही या माध्यमात सामील व्हायचं आहे. 'भारत4इंडिया'ला या शहरी आणि ग्रामीण भागाला, माणसांना जोडणारा पूल व्हायचं आहे. आपण सारे एकत्र येऊया... त्यासाठीचं व्यासपीठ आपली वाट पाहतंय. लॉग इन करा - www.bharat4india.comवर.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.