टॉप न्यूज

डहाणूत अपंग स्नेहसंमेलन

ब्युरो रिपोर्ट

डहाणू -  डहाणूमध्ये नुकतंच अपंगांचं आगळंवेगळं स्नेहसंमेलन पार पडलं. मोठ्या जिद्दीनं अपंगत्वावर मात करून भरारी घेणाऱ्या अपंगांना पाहून धडधाकट माणसांनाही जगण्याचं बळ मिळालं.  

 प्रा. दिलीप पाटील हे दरवर्षी या स्नेहसंमेलनाचं आयोजन करतात. यंदाच्या संमेलनाचं हे 18 वं वर्ष होतं.

हजारो अपंग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी तीन अपंग जोडप्यांचा विवाहही लावण्यात आला आहे.  विवाहित जोडप्यांना सोन्याचं मणिमंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूही भेट म्हणून देण्यात आल्या. याशिवाय अपंग विद्यार्थ्यांना व्हीलचेअरचं वाटप करण्यात आलं. 

 बेटेगाव इथून आलेला इयत्ता सहावीतील कल्पेश दोहडा हा या संमेलनात सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.  दोन्ही हात नसतानाही जगण्याची हार न मानता तो पायांचा मोठ्या कल्पकतेनं वापर करत होता. त्यानं पायानं लिहून दाखवलं त्यावेळी उपस्थितांनी तोंडात बोटं घालून त्याची स्तुती केली.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.