टॉप न्यूज

आंब्याला विम्याचे कवच

ब्युरो रिपोर्ट

रत्नागिरी - राज्यातील अन्य फळांना मिळणारे विमा संरक्षण कोकणातील आंब्यालाही मिळावे, अशी गेल्या  कित्येक वर्षांची मागणी आता फळाला आलीय. राज्य सरकारनं आंब्याचा फळपीक विमा योजनेमध्ये सामावेश केल्यानं कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकांचा चेहरा मोहरला आहे.

सरकारी फळपीक विमा २0११ योजने अंतर्गत राज्यातील संत्रा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब यांना प्रायोगिक तत्वावर संरक्षण मिळाले होते. या योजनेत अन्य फळांनादेखील विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. अखेर त्यावर सकारात्मक चर्चा करून आंब्याचा २0१२-१३ च्या विमा योजनेत समावेश करण्यात आलाय. यासाठी अँग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीची निवड करण्यात येणार आहे.  यामध्ये हापूसबरोबर आंब्याच्या अन्य जातींनाही विम्याचं संरक्षण मिळणार आहे. 

कोकण किनारपट्टीतील समुद्र किनार्‍यापासून अंदाजे १५ किमी पेक्षा आतील १९ तालुक्यांतील ७२ गावे तर १५ किमी अंतराबाहेरील ३७ तालुक्यांतील १४२ अशा गावांना या विमा योजनेचा लाभ होणार आहे. सध्या कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये आंब्याचं उत्पादन होतं. ठाणे जिल्ह्यातील ३ तालुके १४ गावे, रायगड जिल्ह्यातील ५ तालुके  १८  गावे रत्नागिरी जिल्ह्यातील ६ तालुके  २२ गावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ तालुके १८ गावे तर समुद्र किनार्‍यापासून १५ किमीबाहेरील ठाणे जिल्ह्यातील १२ तालुके ३५ गावे,  रायगड जिल्ह्यातील ११ तालुके ४४  गावे, रत्नागिरी जिल्ह्यातील  ८ तालुके २१ गावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ तालुके ४२ गावांतील आंबा उत्पादकांना याचा लाभ होणार आहे. 

या योजनेत प्रति हेक्टरी एक लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. त्याकरिता १२ हजार रुपयांचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य तसचं केंद्र सरकार मिळून प्रत्येकी 25 टक्के असे एकूण 50 टक्के अनुदान मिळणार असून उर्वरित 50 टक्के रक्कम आंबा उत्पादकानं भरायची आहे. या योजनेमुळं प्रतिकूल हवामानामुळं आंब्याचं नुकसान झाल्यास शेतकऱ्याला मदतीचा हात मिळणार आहे.

असे मिळेल विमा संरक्षण 

  • १ जानेवारी ते १५ एप्रिल २0१३ या काळात अवेळी पाऊस झाल्यास किमान ८ हजार रुपये तर कमाल २0 हजार रुपये 
  • १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २0१३ या काळात कमी तपमान झाल्यास किमान ३५00 रुपये तर कमाल २0 हजार रुपये 
  • १६ एप्रिल ते १५ मे २0१३ या काळात अवेळी पाऊस झाल्यास किमान ८ हजार तर कमाल २0 हजार रुपये 
  • १५ मार्च ते ३१ मे २0१३ या काळात जास्त तपमान झाल्यास किमान १0 हजार तर कमाल ४0 हजार

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.