टॉप न्यूज

अंबरनाथमध्ये मनसेचा मोर्चा

ब्युरो रिपोर्ट

ठाणे – वेगानं वाढणाऱ्या अंबरनाथ शहरातील विविध मागण्यांकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दंड थोपटले आहेत. शुक्रवारी तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी होता. तातडीनं या मागण्या पू्र्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर जाधव यांनी दिला.

 मागण्या

पूर्वेकडील स्मशानभूमीची जागा पालिकेच्या ताब्यात मिळावी, चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामावर कारवाई करावी, परप्रांतीयांना प्राधान्य न देता स्थानिकांना एमआयडीसीत नोकऱ्या द्याव्यात, सूर्योदय सोसायटीची खरेदी-विक्री हस्तांतर बंदी उठवावी, आदी प्रमुख मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. स्मशानभूमीबाबत आपण जातीनं लक्ष घालणार आहोत, असं तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितलं. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामावर कार्यवाई करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पूर्वेकडील स्मशानभूमीची जमीन एक महिन्यात आत पालिकेच्या ताब्यात देण्यात आली नाही, तर मनसे नियोजित जागेवर स्मशानभूमीचं काम सुरू करील, असा इशारा सुधीर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.