टॉप न्यूज

टेरेसवर फुलली अंजिराची बाग

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया - संपूर्ण पूर्व विदर्भाचं हवामान धान पिकाला अनुकूल असल्यानं इथले शेतकरीही धान उत्पादनाला आपली पारंपरिक लागवड म्हणून प्राधान्य देतात. पण गोंदियातील चंद्रकांत कोसरकर या शिक्षकानं या पारंपरिक धान उत्पादनाच्या पिकाला आव्हान दिलंय. त्यांनी आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर कुंड्यांमध्ये अंजिराची यशस्वी लागवड केलीय. शेतकऱ्यांनीही धानपिकात त्याची लागवड करावी, असं आवाहन ते करतायत.

कोसरकर यांनी टेरेसवर २५ कुंड्यांमध्ये शेणखात टाकून अंजिराची कलमं लावली. त्यांच्या या प्रयत्नाला भरपूर यशही मिळालं. कुंडीतील कलमांनी आता अंजीरं लगडलीत. या यशामुळं ते म्हणतात की, या अंजिराची लागवड धानाच्या शेतात घेण्यास काहीच हरकत नाही. कारण अंजिराला चांगली मागणी असल्यानं हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचं एक चांगलं साधन होऊ शकतं. 

विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करू नये. यासाठी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देऊन मुबलक नफा देणाऱ्या अंजिराच्या पिकाचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावा,  असा सल्ला कोसरकर देतात. आपली आर्थिक तंगी आणि सावकाराच्या कर्जाखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग आता वरदान ठरू शकतो. आता गरज आहे ती जनजागृती आणि मार्गदर्शनाची.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.