टॉप न्यूज

समाज दिनाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद

ब्युरो रिपोर्ट

मुंबई - कुष्ठरोग्यांना नवीन आयुष्य देणाऱ्या बाबा आमटे यांचा आज 26 डिसेंबर हा जन्मदिन. 'भारत4 इंडीया'च्या वतीनं हा दिवस आम्ही समाज दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला समाजाच्या विविध स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी काही विशेष कार्यक्रम झाले. अमरावतीत समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी समाजकार्याची शपथ घेतली.  उज्ज्वल आणि बलशाली भारताच्या निर्मितीकरता आम्ही सदैव तत्पर राहून प्रयत्न करू, अत्याचारग्रस्त, दूर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याकरता सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करू, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

 

विविध मान्यवरांनी 'भारत4इंडिया'च्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. शिवाय वर्षभर याविषयी जागृत राहण्याचं आवाहन केलंय.  जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनीही शुभेच्छा देऊन उपक्रमात सहभागी व्हायचं आवाहन केलंय. ''बाबांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. समाजात आज आत्मकेंद्रितपणा आलाय. प्रत्येक जण आपल्यापुरतं बघतोय. त्यामुळंच बाबा आमटेंसारख्या महान समाजसेवकाच्या जयंतीदिनी असा उपक्रम ही काळाची गरज आहे. त्यामुळं दिनदुबळ्यांना नक्कीच मदतीचा हात मिळेल,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आनंदवन हे सामाजिक कार्यकर्ते तयार करणारं एक सामाजिक विद्यापीठ आहे, त्यामुळं बाबांचा जन्मदिवस तरुण पिढीकडून समाजदिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, अशी अपेक्षा डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केलीय.  जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.  जर आपल्याला आहे रे, नाही रे वर्गातील अंतर कमी करायच असेल, तर नाही रे वर्गाच्या लुटीची व्यवस्था बदलावी लागेल.  मात्र, तोपर्यंत नाही रे वर्गातील माणसांना माणसांसारखं जगण्याचा अधिकार आहे, ही जाणीव आहे रे वर्गातील प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. समाजदिन संकल्पनेतून ते साध्य होईल, अशा आशाही त्यांनी व्यक्त केलीय. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही उपक्रमाचं कौतुक केलंय. सेवा करण्याची किंमत करणाऱ्यांचा हा देश आहे. या देशाच्या इतिहासात कोणत्याही श्रीमंताचं नाव नाही, केवळ देशाची सेवा करणाऱ्या आणि शुरांच नाव आहे. स्वर्गीय बाबा आमटेंनी आणि इतर संत महात्मांनी 'जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले' हाच संदेश दिला. समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करा, हाच बाबांच्या जीवनकार्याचा संदेश आहे. असं सांगत बाबांना अभिनादन करुन 'भारत4 इंडिया'च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

माजी आमदार अमर काळे यांनी प्रत्येकानं समाजाला आपल्या परीनं योगदान दिल पाहिजे, या उपक्रमाच्या माध्यमातून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून तरी समाजाला योगदान द्यावं, अस आवाहन केलं.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि जेष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर यांनी बांबाची कविता म्हणून 'भारत4 इंडिया'च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पद्मश्री पद्मजा फेणानी यांनी बांबाच्या कवितेच वाचन करुन सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.