टॉप न्यूज

आश्रमशाळेतील मुलीवर सामूहिक बलात्कार

ब्युरो रिपोर्ट

नाशिक - पुणे जिल्ह्यात आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी विषबाधेनं दगावले. पाठोपाठ शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय.

पीडित मुलगी सुरगाणा तालुक्यातील पळसन इथल्या पोस्ट बेसिक आश्रमशाळेत बारावीच्या वर्गात शिकते. रविवारी रात्री चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं उघड झालंय.  या घटनेचा राज्यभरातून निषेध होत असून आश्रमशाळेत चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल विचारला जातोय.

सामूहिक बलात्कार

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन इथल्या पोस्ट बेसिक आश्रमशाळेत बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर रविवारी चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित चौघांना अटक केली असून यातील एक तरुण हा जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीवरील चालक असल्याचं सांगण्यात येतंय. रविवारी दुपारी या चौघांनी पीडित मुलीला आश्रमशाळेच्या पाठीमागे नेऊन हे घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर संबंधित मुलीनं मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला. मात्र त्यांनी काहीच कारवाई न करता संबंधित मुलीला पालकांकडं पाठवून दिलं. त्यानंतर पालकांनी पोलीस आणि कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांकडं तक्रार केली. मात्र, त्याची फारशी दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. अखेर पालकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडं धाव घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.