टॉप न्यूज

मुख्याध्यापकासह दोघे निलंबित

ब्युरो रिपोर्ट

नाशिक - जिल्ह्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरणी आदिवासी विभागानं मुख्याध्यापकांसह दोन जणांना निलंबित केलंय. याशिवाय शाळेतील इतर १३ जणांची विभागीय चौकशी सुरू केली असुन कळवणचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

सुरगाणा तालुक्यातील पळसन इथल्या पोस्ट बेसिक आश्रमशाळेत बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर गेल्या आठवड्यात चार तरूणांनी सामुहिक बलात्कार केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी चार तरूणांना अटक केली. त्यानंतर आदिवासी विभागानं केलेल्या प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापकासह १५ जणांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलाय. त्यामुळं या सर्वांच्या निलबंनाचा प्रस्ताव विभागानं तयार केला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी सर्वांवर कारवाई करण्यास विरोध केला होता. त्यामुळं मुख्याध्यापक डी. एस. देवरे आणि शाळेचे अधीक्षक एस. जी. शिरसाठ या दोघांना सेवेतून निलंबित केल आहे. तर शिक्षक, शिपाई, चौकीदार, खानसामा अशा एकुण १३ जणांची विभागीय चौकशी सुरू केलीय. 

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली होती. दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी आदिवासी विभागानं आता भरारी पथकांची स्थापना केली असुन शाळांच्या सुरक्षेची नियमित तपासणी केली जाणार आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.