
रत्नागिरी- बहुचर्चित जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात जनहित सेवा समिती आणि मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला कायम विरोध आहे, हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.
जैतापूर प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचंही आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यासोबत बातचित केलीय आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ मुश्ताक खान यांनी...
Comments
- No comments found