टॉप न्यूज

समाजमन बदलायला हवं

ब्युरो रिपोर्ट

वाशीम – नाटकाचा उपयोग निव्वळ मनोरंजनासाठी न होता समाज प्रबोधनासाठी व्हावा, असं मत ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष राम जाधव यांनी व्यक्त केलंय. वाशीम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं दोन दिवसीय नाट्य महोत्सव आणि कलावंतांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. अभिनेते मोहन जोशी आणि इतर कलावंतही या महोत्सवाला उपस्थित होते. 

आद्य नाटककार राजशेखर यांच्या काळापासून लाभलेला सांस्कृतिक वारसा आजही वाशीम जिल्ह्यात जपला जातोय.  हीच परंपरा जपत 'अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई'च्या मालेगाव शाखेच्यावतीनं दोन दिवसीय नाट्य महोत्सव आणि कलावंत मेळाव्याचं महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलं होतं.  

नाटकांतून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन व्हावं    

बधिर झालेलं समाज मन बदलण्यासाठी नाट्यकर्मींकडून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांनी सांगितलं. तर विदर्भातला ज्वलंत प्रश्न असलेल्या शेतकरी आत्महत्येचं वास्तव दाखवणारा चित्रपट इथल्याच स्थानिक कलावंतांना घेऊन करण्याची आपली इच्छा अभिनेते मोहन जोशी यांनी यानिमित्तानं इथं व्यक्त केली. शिवाय ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांना सिने आणि नाट्य क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी म्हणून नाट्य परिषदेतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचंही मोहन जोशी म्हणाले. त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्तरावर नाट्यगृहांची निर्मिती करण्याचा आग्रह सरकार दरबारी करण्यात येत असल्याचं मोहन जोशींनी स्पष्ट केलं. 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.