टॉप न्यूज

ग्रंथमहोत्सवाचा सातारा पॅटर्न

शशिकांत कोरे

सातारा - राज्यातील सर्वात मोठा ग्रंथमहोत्सव सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत भरलाय. या ग्रंथ महोत्सवात विविध पुस्तकांचे 100 स्टॉल्स लागले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात जेवढी विक्री होत नाही, त्याच्यापेक्षाही दुप्पट विक्री इथं झालीय. जवळजवळ तीन कोटी रुपयांची उलाढाल होणारा हा ग्रंथमहोत्सव सातारा पॅटर्न म्हणून ओळखला जातो. 8 जानेवारीपर्यंत तो सुरू राहणार आहे.

महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीतून घडलेला सातारा जिल्हा. या सर्व नेत्यांचे विचार, साहित्याचं भांडार भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी सातारा शहरात 14 वर्षांपूर्वी ही ग्रंथालय चळवळ सुरू झाली. यानंतर अखंडपणे या चळवळीद्वारे ग्रंथमहोत्सव आयोजित केला जातो.

ग्रंथदिंडीत शाळांचा सहभाग

या महोत्सवात शहरातील 27 शाळांनी सहभाग घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद, गणितज्ञ रामानुज आदी थोर महात्म्यांचे चित्ररथ यानिमित्तानं काढण्यात आले.

नवी परंपरा

या ग्रंथ चळवळीद्वारे वाचनसंस्कृती वाढावी.  समाजात वाचन चळवळ तेवत राहावी या दृष्टीनं जिल्ह्यातील नवी पिढीही क्रांतिकारक पाऊल टाकतेय. या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यात वाचकप्रेमींची मांदियाळी जमलीय.  राज्यातील सर्व साहित्यिक, कवी यांनी वेळोवेऴी याला भेटी दिल्यात. लेखक, कवींना इथं व्यासपीठ मिळतं. साहित्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या चर्चा, परिसंवाद इथं होतात. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, तसंच संत साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे या महोत्सवाला उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय पुरुषांचे आणि त्यांच्या विचारांचे दाखले देत भावी पिढीला मार्गदर्शन केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.