टॉप न्यूज

उपोषण एका शिल्पकाराचं

अविनाश पवार

पुणे -  सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांचे अर्धं पुतळे बनवणाऱ्या कलाकाराला उपोषणाला बसण्याची वेळ आली. पुणे शिक्षण मंडळानं राजेंद्र आल्हाट नावाच्या कलाकाराला हे अर्धं पुतळे बनवून पुण्यातल्या शाळांमध्ये बसवण्याची सूचना केली होती. या पुतळ्यांचे पैसे त्या शाळांनी द्यायचे होते. मात्र, या शाळांनी त्यांना पैसेही दिले नाहीत आणि दुसरीकडं पालिका शिक्षण मंडळानं याकडं गांभीर्यानं पाहिलंही नाही. त्यामुळं न्याय मागण्यासाठी त्यांना उपोषण करावं लागलं.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी त्यांचे अर्धपुतळे पालिकेच्या शाळांमध्ये बसवण्याचा निर्णय पुणे शिक्षण मंडळानं घेतला. मात्र प्रती पुतळा ६००० रुपये याप्रमाणं 300 पुतळे घेण्याचा करार करण्यात आला. त्याप्रमाणं पुतळे दिले. पण दोन वर्षं उलटूनही आजपर्यंत केवळ ९० पुतळ्यांचेच पैसे मिळाले, असं आल्हाट यांनी सांगितलं. आता पैसे मागायला गेलं की संबंधित शाळा पैसे देण्यास असमर्थता दर्शवून पुतळे घेऊन जा, असं बिनदिक्कतपणे सांगते. त्यामुळं नाईलाजानं घेऊन सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केल्याचं आल्हाट सांगतात.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.