
वर्धा - कुस्ती म्हटली की, आठवतात लाल माती चोपडलेले पिळदार शरीरयष्टीचे मल्ल. परंतु वर्ध्याच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या मैदानावर चक्क महिलांची कुस्ती रंगली होती. 5 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्ं 15व्या वरिष्ठ राज्यस्तरीय महिलांच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन जिल्हा कुस्तीगीर परिषद आणि महिला विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. त्यामुळं प्रेक्षकांचा भुवया चांगल्याच उंचावल्या.
या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून 46 संघ आणि 350 महिला कुस्तीगीरांनी हजेरी लावली. या स्पर्धेत 48 किलो, 51 किलो, 55 किलो, 59 किलो, 63 किलो, 67 किलो, 72 किलो अशा वजनी गटांमध्ये ही कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेचं उद्घाटन भाजप नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. झालेली ही स्पर्धा महिलांमधील खिलाडूवृत्तीला नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरली.
स्पर्धेचे निकाल
48 किलो - कौशल्या वाघ, मुंबई (सुवर्ण), हर्षदा सनस, पुणे (कांस्य), तेजस्विनी मोहिते, उस्मानाबाद (कांस्य), तेजश्री मेंडके, कोल्हापूर (कांस्य)
51 किलो - माधुरी घराड, कोल्हापूर (सुवर्ण), प्रियांका वेरुळकर, कोल्हापूर (कास्य), शीतल पाल, वर्धा (कास्य), सोनाली तोडकर, बीड (कास्य)
55 किलो - अश्विनी मोहिते, उस्मानाबाद (सुवर्ण), समीक्षा उरोट, रायगड (कांस्य), नंदिनी साळुंके, कोल्हापूर (कांस्य), श्यामल मेंडके, बीड (कांस्य)
59 किलो - रेश्मा माने, कोल्हापूर (सुवर्ण), विजया खुरवड, पुणे (कांस्य), यशश्री खडसे, अमरावती (कांस्य), पूजा ढोणे, सोलापूर (कांस्य)
63 किलो - स्नेहल परदेशी, नाशिक (सुवर्ण), प्रियांका बुरंगले, पुणे (कांस्य), रुपाली होळकर, पुणे (कांस्य), पुष्पा मोरे, पुणे (कांस्य)
67 किलो - मनीषा दिवेकर, पुणे (सुवर्ण), समृद्धी पवार, रायगड (कांस्य), मोहिनी नवले, अकोला (कांस्य), राजश्री कांबळे, सोलापूर (कांस्य).
72 किलो - अश्विनी बोराडे, पुणे (सुवर्ण), स्वीटी अवचट, वर्धा (कांस्य), प्रियांका बोलफोडे, पुणे (कांस्य), राणी माने, सोलापूर (कांस्य)
Comments
- No comments found