टॉप न्यूज

पुण्यात भरली विद्यार्थी संसद

ब्युरो रिपोर्ट

पुणे - येथील एम.आय.टी.च्या प्रांगणात तिसऱ्या भारतीय छात्र संसदचं आज उदघाटन झालं. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या छात्र संसदेत संपूर्ण देशभरातून सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, तर या कार्यक्रमात देशातील महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

विषय पुढीलप्रमाणे - 

१. रिसोल्व्ह कॉन्फ्लिक्ट - सिक पीस 

२. डाईंग फार्मर अॅण्ड ग्रोईंग इकॉनॉमी

३. पोलिटिक्स - डोण्ट हेट इट, बी पार्ट ऑफ इट 

४. पोलिटिक्स थ्रू  द  आय ऑफ इंडियन सिनेमा  

५. यंग इंडिया, ओल्ड लीडर्स 

६. व्हायब्रनंट कोर्पोरेट - व्हायब्रंट इंडिया 

७. एम्ब्रेस डायव्हरसिटी - प्रोमोट युनिटी 

८. पॉवर्टी : अ ग्रेटर टेरर 

या विषयांवर विद्यार्थी संसदेत मौलाना सय्यद कलबे रुशाहीद रिझवी (प्रख्यात इस्लामिक स्कॉलर), राजू शेट्टी (फार्मर्स लीडर), डॉ. योगानंद शास्त्री - स्पीकर, दिल्ली विधानसभा,  नितीश कुमार - मुख्यमंत्री बिहार, ओमर अब्दुल्ला  - मुख्यमंत्री, जम्मू काश्मीर, शबाना आझमी - समाजसेविका आणि सिने अभिनेत्री, सुभाष घई -  चित्रपट दिग्दर्शक, राजीव बजाज - एम. डी., बजाज ऑटो, परेश रावल - (अभिनेता), रवीशंकर प्रसाद (संसद सदस्य, राज्यसभा), अखिलेश यादव (मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश), स्वामी सुखगोदानंद, (आध्यात्मिक गुरू, संस्थापक प्रसन्ना ट्रस्ट) हे आणि असे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. जे विद्यार्थी इथे येऊन या छात्र संसदेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत ते व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेत. पाहूयात तरुण भारताची ही एक झलक. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.