टॉप न्यूज

स्वामी विवेकानंद जयंती साजरी

ब्युरो रिपोर्ट

सांगली - सांगलीत स्वामी विवेकानंद सार्थ शक्ती समारोहाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी केलेली कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. जिल्हयात अशा ४६ ठिकाणी विविध शोभायात्रा काढण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलं.

सांगलीच्या रस्त्यावर आज सकाळपासूनच विविध शाळांतील विद्यार्थी जमले होते. या सर्वांचं निमित्त होतं ते आज असलेली स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती. यामध्ये शाळेतील मुलींनी भगवे फेटे परिधान केले होते. या शोभायात्रेतील विद्यार्थ्यांची लेझीम पथकं वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. यामध्ये सांगलीतील जवळपास ३० कॉलेज आणि शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.