टॉप न्यूज

नरभक्षक वाघीण ठार

ब्युरो रिपोर्ट
गोंदिया -  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीनं मागील आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. त्यामुळं तिचा वावर असलेल्या गावांमध्ये दहशत पसरली होती. पण अखेर वन विभागानं यशस्वी शोध मोहीम राबवली. 5 महिलांना ठार केलेल्या या वाघिणीला पिंजऱ्यात जेरबंद करता आलं नाही. त्यामुळं अखेर तिला गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. आता इथली माणसं पहिल्यासारखा मोकळा श्वास घेऊ लागलीत.
 

या नरभक्षक झालेल्या वाघिणीनं १५ डिसेंबरपासून ४ जानेवारीपर्यंत ५ महिलांना ठार केलं. वाघिणीच्या दहशतीमुळं गावातील लोकं घराबाहेर निघत नव्हते. मुलं शाळेत जायला तयार नव्हती. शेतकरी शेतात काम करत नव्हते. अखेर वन विभागानं शोध मोहीम हाती घेतली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मालदा सिलेझरी येथील जंगलात एका गुराख्याला वाघीण दिसली. त्यानं खबर दिल्यानंतरवन विभागानं इथं सापळा रचला. भक्ष्य बांधून सशस्त्र अधिकाऱ्यांनी मचाणावर ठाण मांडलं. भक्ष्यासाठी आलेल्या वाघिणीला त्यांनी अगोदर बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन देऊन सापळ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यश आले नाही. उलट वाघिणीनं त्यांच्यावरचं चाल करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर जवानांनी गोळ्या घालून तिला ठार केलं. जवानांनी एकूण 9 फैरी झाडल्या. वाघीण पडल्याचं कळताचं गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. साजरा केला. मृत वाघीण सुमारे तीन वर्षांची असावी, असा अंदाज आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.