टॉप न्यूज

सिध्दरामेश्वर यात्रा सुरू

यशवंत यादव, सोलापूर

सोलापूर - सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वराच्या यात्रेस शनिवारपासून मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं प्रारंभ झाला. पंचक्रोशीतील 68 शिवलिंगांना तैलाभिषेक घालून ही यात्रा सुरू झाली. मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं.

श्री सिध्दरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचं प्रतीक असलेल्या नंदीध्वजांचा आणि कुंभार कन्येचा  रविवारी (13 जानेवारी) झालेला प्रतीकात्मक विवाह सोहळा भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच होती. संमती कट्टा रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित केला होता. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाजूच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातूनही लाखो भाविक या यात्रेत सहभागी झालेत. या गड्डा यात्रेला साडेआठशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे.
`सत्यम-सत्यम,
नित्यम-नित्यम`
हे मंगलाष्टकातील शब्द कानी पडले अन् लाखो हात एकाचवेळी अक्षता टाकण्यासाठी उंचावले गेले आणि `शिवयोगी श्री सिध्देश्वर महाराज की जय`चा प्रचंड जयघोष करण्यात आला. संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी करण्यात आली. अलौकिक असा हा अक्षता सोहळा भाविकांना अनुभवता आला. या सोहळ्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यानंतर मानाचे सातही नंदीध्वज 68 लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी रवाना झाले.
`हर्र बोला हर्र सिध्देश्वर महाराज की जय...`च्या जयघोषानं अवघं वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झालं होतं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.