टॉप न्यूज

११वं विद्रोही साहित्य संमेलन

राहुल विळदकर, राहुरी
'सरकारच्या पैशांवर पोळ्या भाजून घेण्याऱ्यांचं नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीवरचं हे संमेलन आहे', असा विचार मांडत ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवारपासून राहुरीतल्या संत गाडगेबाबा साहित्यनगरीतून सुरुवात होतेय. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉ. बाबुराव गुरव.
 

vidrohi

सामाजिकतेची मशाल पेटवून आणि सर्जनशीलतेचं प्रतीक असणारी वाद्यं वाजवून या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. आदिवासी गीते, विद्रोही शाहिरी जलसा आणि 'होय आम्ही राक्षस आहोत' यांसारखे कथाविष्कार घेऊन हे संमेलन रंगणार आहे. त्याचसोबत मुलांसाठीचा बालमेळावाही बच्चेकंपनीचं आकर्षण असणार आहे.एकंदरीतच कष्टकऱ्यांना चेहरा देणारं हे संमेलन वेगळा विचार समाजात रुजवेल अशी आयोजकांना खात्री आहे. 'भारत४इंडिया' या संमेलननाचे थेट आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे - 
सकाळी 9 वाजता - कृषी विद्यापीठातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संमेलनास सुरुवात

11 ते 1 – उद्घाटन सोहळा - मशाल पेटवून आणि बहुजन समाजाच्या कलात्मक सर्जनशीलतेची प्रतीकं असलेली सर्व प्रकारची वाद्यं वाजवून संमेलनाचं उद्घाटन 

उपस्थिती - डॉ. बाबुराव गुरव, संमेलनाध्यक्ष 
पार्थ पोळके, विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे अध्यक्ष
बसवलिंग पट्टदेववरु , उद्घाटक


दुपारी 3 ते 5 - परिसंवाद - भारतीय स्री समतेच्या ऐतिहासिक संघर्षाचा वारसा आणि भवितव्य
अध्यक्ष नूतन माळवी, सहभाग - प्रतिभा शिंदे, मनिषा टोकले, स्मिता पानसरे, अॅड. रंजना पगार-गंवादे


संध्याकाळी 5 ते 7 - आदिवासी स्त्रीगीते 
सादरीकरण आणि मांडणी
कविवर्य कॉ. वाहरु सोनावणे आणि सहकारी

संध्याकाळी - 7 ते 8.30 - होय आम्ही राक्षस आहोत
प्राचार्य डॉ रांजेद्र कुंभार, प्रा. शामसुंदर मिरजकर, प्रा. गौतम काटकर


रात्री 9 वाजता - कवी संमेलन
अध्यक्ष संतोष पवार

रविवार
सकाळी 8 ते 9 - शाहिरी जलसा 
मुलाखत - नंदु माधव, राजकुमार तांगडे, संभाजी भगत


सकाऴी 10 वाजता - बाल मेळावा - मुक्ता साऴवे बालमंच

सकाळी 10.30 ते 12.30 - परिसंवाद - जातिवंताचा लढा, ऐतिहासिक आढावा व पुढील दिशा 
अध्यक्ष – डॉ. आ. ह. साळुंखे 
सहभाग - सचिन गरुड, जावेद पाशा, रावसाहेब पाटील, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. प्रकाश शिरसाट


दुपारी 12.30 ते 2 - कथा कथन - प्रसेनजीत पाटील, अनिस शेख, देवदत्त हुसळे
सडक नाटक, सादरीकरण - कॉ सफदर हाश्मी स्मृती स्पर्धा, इस्लामपूर प्रथम क्रमांक प्राप्त नाटक


दुपारी 3 ते 5 - गटचर्चा व मांडणी
मंनोरंजन उद्योग - टिव्ही सिनेमा, मीडिया यांच्यातील लोकप्रिय संस्कृतीविश्व व विषमता
ब्राम्हणी-भांडवली शिक्षणप्रणाली आणि मुक्तीचा यक्षप्रश्न
अभिजनांची मराठी व मराठी बोलीची विवीधता
बहुजन प्रतिकांचे वैदिकीकरण, ब्राम्हणी विकृतीकरण व बहुजन प्रतिकार


संध्याकाळी 5 वाजता - समारोप 
उपस्थिती - एकनाथ गायकवाड, हणुमंत उपरे, कॉ. धनाजी गुरव
ठराव वाचन
यशवंत मनोहर 
आभाराचे भाषण – डॉ. बाबुराव गुरव


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.