टॉप न्यूज

राहुरीत पेटली 'विद्रोही' मशाल

राहुल विळदकर, राहुरी
ऐतिहासिक मशाल पेटवून आणि विद्रोही साहित्याचा गजर करत कष्टकऱ्यांच्या पारंपरिक संस्कृतीचा मागोवा घेत, राहुरीच्या ११व्या विद्रोही साहित्य संमेसलनाचं आज उद्घाटन झालं.  कर्नाटकाचे विद्रोही साहित्यातले प्रसिद्ध कार्यकर्ते डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते मशाल पेटवून या संमेलनाचं उद्घाटन झालं.

Vidrohi for aricle bharat4india.comसंत गाडगेबाबा साहित्यनगरी दुमदुमली

संमेलनाआधीच्या मिरवणूक दिंडीत अनेक कार्यकर्त्यांबरोबरच आदिवासी, कष्टकरी समाजाचे प्रतिनिधी त्यांच्या पारंपरिक वाद्यांसह सहभागी झाले होते. राहुरी गावातून या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर राज्यभरातून आलेल्या दिंड्यांनीही रॅलीमध्ये सहभाग घेतला. जातपात मिटवायचेय, लिंगभेद गाडायचाय आणि नवा विचार रुजवायचाय, हाच विचार पुढे नेत आता दोन दिवस हे साहित्य संमेलन रंगणार आहे. राहुरीतल्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या मैदानावर त्यासाठी संत गाडगेबाबा साहित्यनगरी उभाण्यात आलीय. त्याचबरोबर राक्षसाच्या डोक्यावरील शिंगांचा किरीट असलेलं या संमेलनाचं बोधचिन्ह लक्ष वेधून घेणारं आहे.

संमेलनातले आजचे दुपारचे कार्यक्रम

दुपारी 3 ते 5 - परिसंवाद - भारतीय स्त्रीसमानतेच्या ऐतिहासिक संघर्षाचा वारसा आणि भवितव्य
अध्यक्ष नूतन माळवी, सहभाग - प्रतिभा शिंदे, मनीषा टोकले, स्मिता पानसरे, अॅड. रंजना पगार-गंवादे

संध्याकाळी 5 ते 7 - आदिवासी स्त्रीगीते
सादरीकरण आणि मांडणी
कविवर्य कॉ. वाहरु सोनावणे आणि सहकारी

संध्याकाळी - 7 ते 8.30 - होय आम्ही राक्षस आहोत
प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार, प्रा. श्यामसुंदर मिरजकर, प्रा. गौतम काटकर

रात्री 9 वाजता - कवी संमेलन
अध्यक्ष संतोष पवार

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.