टॉप न्यूज

जागर, स्त्री-पुरुष समानतेसाठी

ब्युरो रिपोर्ट
मुंबई - स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा विचार करून राज्य सरकारनं स्त्री-पुरुष समानेतेची बीजं महाविद्यालयीन काळातच रुजवावा, हा उद्देश समोर ठेवून 'जागर जाणिवां'चा हा उपक्रम सुरू केलाय. याची घोषणा उच्चतंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत केली. या उपक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं अतिशय मोलाचं योगदान दिलंय. या उपक्रमाच्या निमित्तानं एकूणच राज्यातल्या महाविद्यालयांचं स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतलं ऑडिटही होईल, अशी अपेक्षा आहे.
 

jagarमहाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारं राज्य आहे. या राज्यात उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण समाधानकारक नाही. ते वाढवण्यासाठी, स्त्रीसमानतेमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, महाविद्यालयाचं प्रशासन आणि शिक्षक यांच्या सहभागानं स्पर्धा आणि पारितोषिकांच्या स्वरूपात नावीन्यपू्र्ण योजना म्हणून 'जागर जाणिवां'चा याकडं सरकार पाहत, असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी, शिक्षक, महाविद्यालय प्रशासन इत्यादींना त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण सहभाग घ्यावा यासाठी जिल्हा, विद्यापीठ आणि राज्य स्तरावर महाविद्यालयांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पारितोषिकं लाखाच्या घरात ठेवलीत आणि त्यासाठी या वर्षासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही सरकारनं मंजूर केलाय.

'जागर जाणिवां'चा उपक्रम काय?
'जागर जाणिवां'चा या अभियानांतर्गत स्पर्धेसाठी निकष आणि आवश्यक बाबी :-
१) विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्राप्त झालेल्या सूचना आणि त्यासाठी हाताळलेली कार्यपध्दती
२) विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचना महाविद्यालयांनी स्वीकारल्या आणि त्यावर अंमलबजावणी केली
३) शैक्षणिक संस्थेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि इतर उपक्रम
यासाठी महाविद्यालयांना १०० गुण देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्राप्त झालेल्या सूचना आणि त्या सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी हाताळलेली कार्यपद्धती :-
१) अ) स्त्री-पुरुष समानता टिकवण्यासाठी आणि समाजातील स्त्रियांच्या असलेल्या दुय्यम स्थानामध्ये बदल घडवण्यासाठी केलेली सूचना

ब) महाविद्यालयातल्या छेडछाडीमुळं मुलींच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना याला आळा बसवण्यासाठी केलेली सूचना

यामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सूचना, सुविधा आणि इतर उपक्रमाचाही यानिमित्तानं अभ्यास होणार आहे. कारण महाविद्यालयांना जे गुण मिळणार आहेत त्यासाठी खालील बाबी तपासल्या जाणार आहेत.

१) विद्यार्थ्यांमध्ये होणारी छेडछाड, रॅगिंग इत्यादी संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत महाविद्यालयाकडून कोणत्या पध्दतीनं तक्रार निवारण करण्यात आलं यासाठी विद्यार्थी कर्मचारी यांचं समुपदेश करण्याची कोणती व्यवस्था महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे.

२) शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या इतर विविध सोयीसुविधा

३) विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षिततेसाठी महाविद्यालयानं उचललेली विविध पावलं उदा. विशाखा समितीची अंमलबजावणी, महिला विश्रामगृह, महिला स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि स्वच्छता व वार्षिक आरोग्य तपासणी

४) महाविद्यालयापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी वाहतुकीची करण्यात आलेली व्यवस्था करणं

५) महाविद्यालयानं त्यांच्या परिसरात मुलींना आणि त्यांच्या पालकांना उच्चशिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण संस्थेनं केलेले प्रयत्न

६) विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षण, जीवन कौशल्य विकास करणं आणि संवाद कौशल्य, नवीन तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या निर्भर होण्याकरता प्रेरित करण्यासाठी महाविद्यालयं कोणते कार्यक्रम राबवतात.

७) विद्यार्थ्यांना कोणत्याही सामाजिक आणि व्यावसायिक प्रसंगांना आत्मविश्वासानं सामोरं जाता यावं,यासाठी कोणती पावलं उचलली

८) महाविद्यालयाच्या प्रशासन आणि अनुशासनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो काय, त्यात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी महाविद्यालयानं काय प्रयत्न केले

९) विद्यार्थिनींना क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर शिक्षणेतर कार्यक्रमांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयानं केलेले प्रयत्न

असा या अभियानामध्ये समावेश केल्यानं याचा सकारात्मक परिणाम साधला जाईल, असा विश्वास सरकारला वाटतोय. या अभियानाच्या तयारीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पाठपुरावा केला. त्यांनी म्हटलं आहे की, स्त्रियांचे अधिकार आणि त्यांच्यावरच्या अत्याचाराच्या बाबतीत सरकार खूप कमी पडलं आहे, मात्र काही समाधानकारक बाबीही सुरू झाल्या आहेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.