राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेश निवडणुकीत महत्त्वाचा रोल होता. मात्र त्या निवडणुकीत यश काँग्रेसला मिळालं नव्हतं. बिहार, गुजरात या निवडणुकांतही काँग्रेसला अपयश पदरात घ्यावं लागलं होतं. मात्र आता या नव्या जबाबदारीनंतर सगळ्याच बाबींची जबाबदारी राहुल गांधी यांना स्वीकारावी लागेल.
आतापर्यंत दिल्लीत झालेला बलात्काराचा विषय असो किंवा यापूर्वी देशभरात वादळ निर्माण करणारं आंदोलन अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं तेव्हाही जाहीरपणं राहुल गांधी यांनी पक्ष म्हणून भूमिका घेतली नव्हती. आता मात्र संसदेतल्या आणि संसदेबाहेरच्या अनेक राजकीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आता त्यांना कुठल्याच इश्शूपासून दूर पळता येणार नाही.
देशात काँग्रेस नेतृत्वाखालच्या सरकारची प्रतिमा काही चांगली नाही, देशात अनेक घोटाळे या सरकारच्या काळात बाहेर आलेत, सरकारच्या विरोधात अॅण्टिइन्कबन्सी फॅक्टरचा फटकाही आगामी निवडणुकीत काँग्रेसला बसणार आहे, याचा विचार करून आता नवं चैतन्य पक्षात निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे. त्याशिवाय युवा पिढीला पक्षाकडं खेचण्यास राहुल गांधींच्या नेतृत्वाचा फायदा काँग्रेसला घेता य़ेणार आहे. आगामी निवडणुकीत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणंही काँग्रेसला परवडणारं नव्हतं. या सगळ्या बाबींचा विचार करता राहुल गांधी हे काँग्रेससाठी २०१४च्या निवडणुकीत ट्रम्प कार्ड ठरणार आहेत. गांधी घराण्याचं नाव काँग्रेसला नेहमीचं टॉनिक देणार असतं. आता पुढच्या पिढीचं नेतृत्व हेच काम पक्षासाठी करील हेही तितकंच खरं. त्यामुळंच २०१४ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांतही राहुल गांधींचीच रणनीती फायनल ठरणार आहे.
Comments
- No comments found