टॉप न्यूज

हेमंत देसाईंना धमक्या

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लिहिलेल्या एका लेखानं बरंच वादळ उठवलंय. त्यामुळं त्यांना धमक्यांना सामोरं जावं लागतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य़कर्त्यांकडून धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केलीय.

Hemant Desaiदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर विविध विचारसरणीच्या नेतेमंडळींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यानं वेगळंच वादळ उठलं होतं. त्यावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी एका दैनिकाच्या रविवार पुरवणीत 'न बोलायचं काय घ्याल' या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. त्यात सरसंघचालक मोहन भागवत, मनसे प्रमुख राज ठाकरे, आसाराम बापू यांच्या वक्तव्यांचा खरमरीत समाचार त्यांनी घेतला होता. त्या दिवसानंतर हेमंत देसाई यांना संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी फोनवरून धमक्या दिल्या. एसएमएस आणि मेलवरूनही त्यांना धमक्या देण्यात आल्या. शेवटी त्यांनी शिवडीच्या अहमद रफी किडवई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यातील पत्रकार संघटना आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय.

“माझं म्हणणं मान्य नसेल तर लोकशाही मार्गानं निषेध करा. अशा प्रकारे धमक्या देणं, हा चुकीचा मार्ग आहे. आणि अशा कुठल्याही धमक्यांना मी घाबरत नाही, ही टीका सरसंघचालकांवर वैयक्तिकरीत्या केली नसून त्यांच्या विचारांवर टीका करण्याचा माझा हेतू होता,” असं हेमंत देसाई यांनी सांगितलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.