टॉप न्यूज

बीएमएमचं अधिवेशन जुलैमध्ये

ब्युरो रिपोर्ट, मूंबई
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी लोकांसाठी तीस वर्षांहून अधिक काळ झटणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे (बीएमएम) दर दोन वर्षांनी होणारं अधिवेशन यंदा 5 ते 7 जुलै या दरम्यान होत आहे. 'ऋणानुबंध' ही मध्यवर्ती कल्पना घेऊन होणाऱ्या या अधिवेशनाचं 'नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या आपुली मायमराठी' हे घोषवाक्य आहे. या निमित्तानं साधारण चार हजार मराठी बांधवांना उत्तर अमेरिकेत एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.
 

BMM SAREGAMA1अमेरिकेतील प्रोव्हिडन्स या ऱ्होड आयलंड राज्याच्या राजधानीत हे अधिवेशन भरणार आहे. संपन्न सांस्कृतिक वारसा जपतानाच नावीन्यपूर्ण विचार आणि कृतींना चालना मिळावी, हा या अधिवेशनाचा उद्देश आहे, असं बीएमएमचे अध्यक्ष आशीष चौघुले यांनी सांगितलं.
बीएमएम ही संस्था सातासमुद्रापार मराठी भाषा आणि संस्कृती यांचा प्रसार तसंच जोपासना करण्याचं महत्त्वांचं काम करते. त्यामुळंच त्यांच्यावतीनं होणारं हे अधिवेशन अमेरिकेसह इतर प्रगत राष्ट्रात वास्तव करणाऱ्या मराठी बांधवांसाठी पर्वणीच असते. कॉसमॉस सहकारी बँक या अधिवेशनाची मुख्य प्रायोजक असून कोलते-पाटील डेव्हलपर्स आणि सुगी ग्रुप यांनीही भरीव मदत देऊ केल्याचं चौगुले यांनी सांगितलं. राजा-राणी ट्रॅव्हल्स हे अधिवेशनाचे प्रमुख ट्रॅव्हल्स पार्टनर आहेत.
अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्य
इंडो - यू.एस. एज्युकेटर्स समिट
भारतातल्या आणि अमेरिकेतल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्याच्या संधी निर्माण व्हाव्यात, दोन्हीकडील विद्यार्थी, शिक्षक, यांच्यात ज्ञानाचं आदानप्रदान व्हावं, या उद्देशानं 'इंडो-यू.एस. एज्युकेटर्स समिट' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यात भारतातील ५० तसंच अमेरिकेतील ५० असे एकूण 100 नामांकित विद्यापीठांचे कुलगुरू एकत्र येणार आहेत.
बी.एम.एम. बिझनेस कॉन्फरन्स
'इनोव्हेशन, सस्टेनिबिलिटी अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप' या विषयाभोवती अनेक चर्चासत्रं, मार्गदर्शक भाषणं यासारखे कार्यक्रम यावेळी आयोजित केले जाणार आहेत. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील आघाडीचे व्यावसायिकांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम
यंदाच्या अधिवेशनात 'सारेगम २०१३' या दिमाखदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शेकडो मराठी - अमराठी गायकांनी 'सारेगम २०१३' च्या प्राथमिक फेरीमध्ये सहभाग घेतला. याचबरोबर नृत्य, शास्त्रीय संगीत, तसंच नाटकांची मेजवानीही प्रेक्षकांना मिळणार आहे.
बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. एकंदरीतच मराठी माणसाला ग्लोबल करण्याचं काम किंवा महाराष्ट्राची जागतिक स्तरावर नाळ जोडण्याचं काम हे संमेलन करणार आहे. मनोरंजन शिक्षण व्यवसाय असं आयुष्यातले विविध बिंदू जोडणारे हे अधिवेशन खऱ्या अर्थानं कलावंत विचारवंत आणि धनवंत यांचं संमेलन होईल, अशी खात्री आयोजकांना वाटतेय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.