टॉप न्यूज

महिला स्वसंरक्षण शिबिर

विवेक राजूरकर, औरंगाबाद
औरंगाबाद - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलीय. कराटेसारख्या खेळाची कौशल्यं आत्मसात केल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून वेळप्रसंगी त्या अशा वाईट प्रसंगांना खंबीरपणे तोंड देऊ शकतात. त्यामुळंच राज्य सरकारनंही मुलींना शालेय स्तरावरच कराटेचं प्रशिक्षण देणार असल्याचं जाहीर केलंय. हाच धागा पकडून औरंगाबादमध्ये मुलींसाठी कराटे आणि ज्युडो प्रशिक्षणाचं शिबिर  सुरू झालंय.
 

self defence bharat4india.com articleमहिला स्वसंरक्षण शिबिर काळाजी गरज

दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं सगळा देश हादरून गेला. त्यानंतरही संपूर्ण देशभर बलात्काराच्या आणि छेडछाडीच्या घटना घडतच आहेत. त्यामुळंच आता महिलांनीच स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हावं, असा सूर उमटू लागला. त्यातूनच मग महिलांनी पर्समध्ये रामपुरी चाकू वापरण्याचा सल्ला पोलीस अधिकारीच देऊ लागलेत. तर त्यापुढं जात शिवसेनेनं महिला कार्यकर्त्यांना चक्क चाकू वाटप करुन टाकलं. तर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षण देण्याचं जाहीर केलं. औरंगाबादमध्ये माजी उपमहापौर साधना सुरडकर यांच्या पुढाकारानं महिला स्वसंरक्षण शिबीर सुरूही झालंय. विशेष म्हणजे, विविध स्तरातील मुली त्यामध्ये उस्फूर्त सहभाग घेतायत.

शिबिरामुळं आत्मविश्वास वाढला

या शिबिरात 10 वर्षांवरील मुली आणि महिला स्वसंरक्षणाचे धडे गिरवतायेत. पण आता शिबिरात कराटे आणि ज्युडोचं प्रशिक्षण घेतल्यामुळं आमचा आत्मविश्वास बळावला, असं प्रशिक्षणार्थी मुलींनी सांगितलं.

जपानी कराटेचे डावपेच

महिलांनी स्वसंरक्षण कसं करावं यासाठी कराटे आणि ज्युडोचे काही प्रकार यात शिकवण्यात येतायेत. ज्यात प्रामुख्यानं जपानी कराटेचे विविध डावपेच आणि १० सेकंदात एखाद्याला कसं बेशुद्ध करावं, असे प्रकार शिकवले जातायेत. ज्युडो आणि कराटेचे राष्ट्रीय पंच असलेले लक्ष्मीकांत खिची यांनीही कोणतंही मानधन न घेता शिबिरातील मुलींना मार्गदर्शन करतायत. मकर संक्रातीपासून सुरु झालेलं हे शिबिर महिनाभर चालणार आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.