टॉप न्यूज

ठाकूरदास बंग यांचं निधन

ब्युरो रिपोर्ट, वर्धा
भूदान चळवळीतील कार्यकर्ते आणि गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ठाकूरदास बंग यांचं आज 27 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता वर्ध्यातील चेतना विकास फार्म हाऊसवर वृद्धापकाळानं निधन झालं. मृत्यूसमयी ते 97 वर्षांचे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  डॉ. अभय बंग आणि अशोक बंग हे त्यांचे चिरंजीव होत.
 
अमरावती जिल्ह्याच्या गणोरी इथं 1917 मध्ये ठाकूरदास बंग यांचा जन्म झाला. चार भाऊ, एक बहीण असा त्यांचा परिवार होता. शिक्षणानंतर 1942ला त्यांनी सलग तीन वर्षं स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवला. यानंतर काही वर्षं वर्ध्याच्या गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणूनही कार्य केलं. 1945मध्ये त्यांचा सुमनतार्इंशी विवाह झाला. यानंतर 1950मध्ये  त्यांनी नोकरी सोडली आणि गांधीजींच्या आवाहनानंतर स्वदेशी भाषेत शिक्षणाचा प्रचार, प्रसारावर कार्य करण्यास सुरुवात केली. आणीबाणीच्या काळात त्यांनी सलग 19 महिने कारावास भोगला. तर भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या चळवळीसाठी ते 12 वर्षं देशाच्या विविध भागात फिरले. सर्व सेवा संघासाठी तब्बल 50 वर्षं कार्य करणाऱ्या बंग यांनी 10 वर्षं या संघाचं अध्यक्षपदही भूषवलं. बंग यांना त्यांच्या कार्यासाठी जमनालाल बजाज फाऊंडेशन, नागभूषण आदी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं.

गांधीवादी चळवळीतील अखेरचा धागा तुटल्याची भावना व्यक्त करून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय.

28 11 17 25 thakurdas bang1 HIGHT 249 WIDTH 339आठवणीतले ठाकूरदास
ठाकूरदास यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक मान्यवरांना शोक आवरता आला नाही. त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणी जागवल्या. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीही अलीकडचीच त्यांची हृदयस्पर्शी आठवण सांगितली. ठाकूरदासजी म्हणजे गांधीवादी चळवळीचा चालताबोलता इतिहासच होता. अनेक तरुण त्यांना भेटायला येत आणि स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घेत. असंच एकदा एक तरुण आला. गांधीजींच्या सहवासातील अनेक आठवणी ठाकूरदासनी त्यांना सांगितल्या. शेवटी त्याच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, "बाबा गांधीजी गेले, मीही काही दिवसांनी जाईन, तू काय करणार आहेस ते सांग?" आज ठाकूरदास आपल्यात नाहीत, मात्र त्यांचा तू काय करणार आहेस? हा लाखमोलाचा प्रश्न आपण विसरता कामा नये.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.