अरब देशातून भारताकडं जिलेबीचा प्रवास
मध्यपूर्व काळात आशिया खंडात जिलेबी या पदार्थाचा उदय झाला. काही तज्ज्ञांच्या मते अरेबियन देशात सर्वप्रथम झेलिबियी नावानं हा गोड पदार्थ तयार करण्यात आला. मोगल काळात याचा प्रसार वाढला. हिंदुस्थानवर मोगलांची सत्ता होती, सत्ता गेली पण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जिलेबीचा उपयोग होऊ लागला. 1857मध्ये बंडाचा उठाव झाला, त्यामध्ये साताऱ्यासह तीन ठिकाणं होती. सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर कारभारासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हे निर्माण झाले. मात्र भौगोलिक प्रांताच्या इतिहासासोबत सांस्कृतिक बीजं कायम राहिली. देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक गणराज्य पद्धत सुरू झाली.
अशी बनते जिलेबी
जिलेबी तयार करण्यासाठी मैद्याच्या पिठात ताक मिसळलं जातं. दोन दिवस मुरवलं जातं. त्याची एकसारखी तार बनेल एवढी बारीक जिलेबीची कडी बनवतात. हे पीठ गरम तेल अथवा तुपात एका खास कपड्यानं सोडलं जातं. या कापडाचा हातरुमालाप्रमाणं आकार असतो. त्यावर
गोलाकार शिलाईकाम असतं, मधोमध गोलाकर छिद्र असतं, या कपड्यातून कढईत जिलेबीची एकसारखी गोलाकार कडी बनवतात. त्यानंतर सर्वसाधारणपणं साखरेचा पाक तयार करतात. त्यासाठी साखर, वेलची, गुलाबपाणी, काही प्रमाणात लिंबूपाणीही वापरतात, जिलेबी पाकात पाच
मिनिटं ठेवतात. अशा तऱ्हेनं जिलेबी तयार होते.
जिलेबीचे प्रकार
इमरती जिलेबी, रिफाईंड तेलातील जिलेबी, डालड्यातील जिलेबी, तुपातील जिलेबी, साजूक तुपातील जिलेबी.
80 टन जिलेबी विक्री
देशात किती टन जिलेबी प्रजासत्ताकदिनी विकली जाते याचा हिशेब नाही. महाराष्ट्राचंही काहीसं असंच आहे. पण तुम्हाला सातारकरांवरून अंदाज बांधता येईल. सातारा जिल्ह्यात 400 ते 500 मिठाईची दुकानं आहेत. याशिवाय बचत गटातील महिलांनीही जिलेबीचे स्टॉल लावले होते. कराड, फलटण, वडूज अशा तालुक्याच्या ठिकाणी स्टँड परिसरातच खास जिलेबीचेच स्टॉल लागले होते. यावरून ८० टनाच्या आसपास जिलेबी फस्त झाली असावी, असा अंदाज आहे. यावेळी 120 ते 200 रुपये प्रति किलो असा भाव होता. सोबत फरसाणचीही चांगली विक्री झाल्याचं सांगण्यात आलं.
Comments
- No comments found