टॉप न्यूज

डिझेलप्रश्नी मच्छीमार दिल्लीत

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
मच्छीमारांना डिझेल खरेदीवरील सवलत पूर्ववत करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानं सकाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी मच्छीमारांच्या समस्या गांभिर्याने समजून घेतल्या असून, त्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
 
 भेट राहुल गांधीची

महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राहुल गांधी यांची 12, तुघलक लेन येथील निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 15 मिनिटांच्या या भेटीनंतर त्यांनी मच्छीमारांना दिलासा देण्यासंदर्भात आश्वासन दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाने पेट्रोलियम मंत्री मोईली यांच्याशीही चर्चा केली. त्यांनीही मच्छीमारांना दिलासा देण्याबाबत अनुकूल भूमिका व्यक्त केली आहे. या शिष्टमंडळात प्रकाश लोणारे, नामदेव भगत, रमेश पाटील, रामदास संधे आदी मच्छीमारांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

लाखावर मच्छिमार त्रस्त
डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीनं सामान्य माणूस तर त्रस्त झालायचं. पण मच्छिमारांच्या व्यवसायाचा मात्र पायाचं हादरलाय. 18 जानेवारीपासून मच्छिमारांच्या डिझेल अनुदानात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारन घेतला तेंव्हापासून किमती लिटरला 11 ते 13 रूपयांपर्यंत वाढल्या. त्यामुळं मच्छिमारांच्या एकूणचं धंद्यावर आता कु-हाड आलीय. राज्यातले प्रत्यक्ष मच्छिमारी करणारे 1 लाख मच्छिमार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे आणि त्यांच्याशी संबधित असणारे इतर व्यावसायिक असा मिळून आकडा 20 लाखांवर जातो.

कशासाठी श्रेयासाठी?
याचा विचार करूनच राज्यातले काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते यामध्ये अतिशय वेगानं सक्रिय होऊन ही दरवाढ कमी करण्याच्या कामाला लागलेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाचं गांभिर्य पहिल्यांदा ओळखलं आणि यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांच्याकडं पाठपुरावा केला. त्यासंदर्भातल्या बातम्या वर्तमानपत्रात आल्यानंतर काँग्रेसचे नेतेही सक्रिय झालेत. स्वतः मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीला धाव घेतली. आज सकाळी राहुल गांधी यांची मच्छिमारांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन ही दरवाढ रद्द करण्याची त्यांनी मागणी केली. त्यांची ही मागणी ऐकून सकारात्मक आश्वासनही दिलं. विरप्पा मोईली यांचीही भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यांनीही या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं.

fishingसामाजिक भान हवेच
खरंतर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रक्टर ,एस. टी., रेल्वे, बेस्ट एअर इंडिया यांसारखे जे बल्कमध्ये डिझेल खरेदी करतात, त्यांच्या दरात ही वाढ झालीय. पण जे लोक एक कोटीची आरामदायी गाडी घेऊन फिरतात त्यांना आणि जे सामाजिक उपक्रम म्हणून सार्वजनिक उपक्रम चालवतात त्यांच्यामध्ये तफावत करायला हवी. याचा विचार आता करण्याची वेळ आलीय. पण तूर्तास तरी राजकीय नेत्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नाला अग्रक्रम दिल्याचं दिसतंय. कारण त्यांची थेट संख्या हे महत्वाचं कारण आहे. जे संतापले तर त्याचा फटका निवडणुकीत बसेल याचंही भान त्यामागे आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.