टॉप न्यूज

दुष्काळ निवारण आयोग नेमा

शशिकांत कोरे, सातारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाच्या प्रश्नानंतर आता दुष्काळग्रस्तांसाठी लढा उभारलाय. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.
 

raju shetti intro imageस्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुष्काळ निवारण परिषदेच्या माध्यमातून विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी परिषदा घेतल्या. महात्मा फुले यांच्या कटगुण खटाव गावातून या दुष्काळी परिषदेचा समारोप झाला. यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी दुष्काळी भागासाठी खास दुष्काळ निवारण आयोग स्थापन करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन

या परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय, त्यांची सत्ता उलथून टाकल्याशिवाय आता पर्याय नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन केलं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण आयोगाप्रमाणंच दुष्काळ हा देशावरचं संकट आहे, असं समजून दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा, अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांना निवेदन दिलं होतं, याची आठवण करून दिली. मात्र वित्त मंत्रालयानं या मागण्यांची दखल घेतली नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला. 25 फेब्रुवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्यावेळी महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. आता आरपारची लढाई आहे, गेली 40 वर्षं दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारनं पाण्यासाठी झुलत ठेवलंय. त्यामुळं आता बायकापोरं, जनावरांसहित रस्त्यावर उतरा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.