टॉप न्यूज

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या बळीराजांच्या संख्येत वाढ होतेय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील गादेगाव येथील युवा शेतकरी प्रशांत अंकुश बागल (वय 26) यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून29 जानेवारीला आत्महत्या केली. याआधी माळशिरस तालुक्यातील बोंडले येथील एका शेतकऱ्यानं पाणीटंचाईवरून आपलं जीवनमान संपवलं होतं.

Sucide 240x135संध्याकाळी प्रशांत बागल यांनी कृषी रसायन प्राशन करून आपला प्राण गमावला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, आई-वडील, आजी असा परिवार आहे. त्यांच्याकडे फक्त तीन एकर जमीन होती. यंदा दुष्काळामध्ये त्यांची जवळजवळ सर्व शेती पडिक राहिली. उशिरा पाऊस झाल्यानं यंदा खरीपात काहीच पिकलं नव्हतं. रब्बी हंगामातही जनावरांसाठी लावलेले कडवळ, मका हेही पूर्ण वाढ न होता करपून गेले. म्हणून तो शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

मध्यंतरी त्यांनी आपल्या विहिरीचं काम करून, पाईपलाईनही केली होती. मुलं लहान असल्यानं त्यांच्या दवाखान्याचा खर्चही वारंवार होत होता. यामुळं त्यांच्यावर तीन लाखांच्या आसपास कर्ज होतं. या कर्जाच्या ओझ्यामुळं तो नेहमीच तणावामध्ये राहत होता. त्यामुळं घरातही चिडचिड निर्माण झाली होती. त्यांची मुलं अतिशय लहान असल्यानं, कुटुंबाचा आधारच गेल्यानं त्यांची पत्नी आणि आईवडिलांनी टाहो फोडला आहे. मनमिळाऊ तसंच शांत स्वभाव म्हणून परिचित असणाऱ्या प्रशांतच्या जाण्यामुळं गादेगावच्या बोरीमळ्यात शोककळा पसरली आहे.`परसू` म्हणून तो सर्वांमध्ये परिचित होता. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या जाण्याचा गादेगावकरांना चटका लागलाय. सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ख्याती होती. स्वत:ला कमी जमीन असतानादेखील त्यांनी गव्हाणे-बागल वस्ती या शाळेला अगदी नाममात्र किमतीत जमीन दिलीय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.