टॉप न्यूज

आष्टगावला गझल संमेलन

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे सातवं अखिल भारतीय संमेलन येत्या ९ व १० फेब्रुवारी, रोजी अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं आयोजित करण्यात आलंय. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गावी हे संमेलन होत असून गझलप्रेमी जनतेला त्यांनीच आवताण दिलंय.

gazalगझल सागर प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या संमेलनाचं उद्घाटन हॉलंडमधील गिरीश ठाकूर यांच्या हस्ते होणार असून समारोप जेष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अध्यक्षपद जेष्ठ गझलकार प्रल्हाद सोनेवाने भूषवणार आहेत. उद्घाटन सोहळयाचं अध्यक्षपद सुप्रसिद्ध शायर जनाब नसीम रिफअत ग्वालियरी भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मदन जोशी, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त पुरूषोत्तम भापकर, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष व मिटकॉन इंटरनॅशनलचे संचालक संदीप कडवे, मुंबईचे विक्रीकर सहआयुक्त सुभाष येंगडे, वाईचे आमदार मदनदादा भोसले, आमदार यशोमतीताई ठाकूर, सुलभाताई खोडके, उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
संमेलनाला येणाऱ्या प्रतिनिधिंसाठी रू.२००/ एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात आले असून यामध्ये निवास सर्वसाधारण, भोजन, नाश्ता, चहा इ. व्यवस्थांचा समावेश आहे. अधिक माहितीकरिता भीमराव पांचाळे, २०२ नेहा सोसायटी, प्लॉट नं.१०४, गोराई २, बोरिवली पश्चिम, मुंबई ९१, फोन ०२२-२८६९९९११, ०९९६९५७९९११, ०९३२४९०५०१८. आष्टगांवः ०९८६०९५०७२४ घनश्याम, ०९६०४५८४८९३ राम, ०९७६४२०३८९९ लक्ष्मण जेवणे यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.

संमेलनातील दोन दिवसांचे कार्यक्रम

शनिवार दि. ९ फेब्रुवारी
सकाळी ११ वाजता उद्घाटन.
दुपारी २.३० वा. 'ग्रामीण जीवन आणि गझल' या विषयावर परिसंवाद
दुपारी ४.३० वा. 'पहिला मुशायरा' त्यानंतर विदर्भाची लोकधारा एक झलक, हा कार्यक्रम. यात महादेवाची गाणी, नागोबाची बारी, गोंडी नृत्य गायन, अवधुती भजन, भुलाबाईची गाणी, गवळण, बहीरमबोवाची गाणी (डायका) इ. अभिजात लोककलांची झलक पेश करण्यात येईल.

रविवार दि. १० फेब्रुवारी
सकाळच्या पहिल्या सत्रात गझल संबंधी विविध विषयांवर मुक्तांगण हा परिसंवाद.
आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गजलकारांचे भावविश्व, गझलच्या भावी वाटचालीची दिशा इ. विषयांवर मुक्तचर्चा.
सकाळी ११.३० वाजता - गझल गायन मैफिल
दुपारी २.३० वाजता - दुसरा गजल मुशायरा
सायंकाळी ५ वाजता - समारोप सोहळा. गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे गझल गायन


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.