टॉप न्यूज

तळेगावात घोड्यांच्या स्पर्धा

ब्युरो रिपोर्ट
पाळीव प्राणी मग ते कुत्र्यांपासून अगदी धनिकांनी रेससाठी स्टड फार्मवर पाळलेले घोडे असोत. जीवाभावाच्या नात्यानं ते माणसांशी एकरूप होतात. त्यातूनच त्यांचं माणसांशी एक वेगळंच सख्य निर्माण होतं. घरातील एखाद्या सदस्यासारखंच त्यांचं स्थान असतं. तर अशा आपल्या पाळीव प्रण्यांना घेऊन एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं तर काय बहार येईल नाही? नेमका हाच उद्देश लक्षात घेऊन पुण्यानजीकच्या तळेगावमध्ये जॅपलूप ईक्वेस्टेरिअन सेंटरमध्ये ईक्वेस्टेरिअन स्पोर्टस् म्हणजेच घोड्यांच्या खेळांची स्पर्धा सुरू झालीय.
 


पश्चिम भारतात होणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धांपैकी ही एक नावलौकिक मिळवलेली स्पर्धा. ज्यापलूप ही संस्था आयोजित करत असलेल्या या स्पर्धेचं यंदाचं पाचवं वर्ष आहे. मोठ्या उत्साहात आज (शुक्रवारी) या स्पर्धेचं उदघाटन झालं. पुढील तीन दिवस म्हणजेच १० फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. पहिल्या दिवशी मुंबई आणि पुण्यातील बऱ्याच लहान-मोठ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. वेगवेगळ्या भागांमध्ये ही ईक्वेस्टेरिअन खेळांची स्पर्धा विभागली गेली आहे.

 HORSEस्पर्धेचे प्रकार पुढीलप्रमाणं :

१) शो जम्पिंग : शो जम्पिंग प्रकारामध्ये खेळाडूंना विविध अडथळ्यांना सामोरं जाऊन घोड्यांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागते. यात घोड्यावरील आणि घोड्याच्या वेगावर पकड असणं खूप महत्त्वाचं असतं.

 २) पोल बेंडीग : पोल बेंडीग प्रकारात घोडेस्वाराला आपल्या मार्गात असलेल्या अडथळ्यांना नागमोडी जाऊन रेस पूर्ण करायची असते.

 

३) ड्रसाज : ड्र्साज  स्पर्धेमध्ये घोडेस्वाराला ठरवून दिलेल्या रूटप्रमाणं आपली रेस पूर्ण करावी लागते.  यात परीक्षक घोडा आणि घोडेस्वार व्यवस्थित तयार होऊन आलेत की नाही, घोडा सांभाळण्याची घोडेस्वाराची पद्धत, यावर गुण मिळतात. यामध्ये घोडेस्वाराला आपल्या घोड्याच्या नाना कळा माहीत असणं गरजेचं असतं. या प्रकारात घोड्स्वारानं जर का आपल्या घोड्याला योग्यरीत्या काबूत ठेवलं तर अत्यंत सुंदर प्रदर्शन पाहायला मिळतं.  

 

क्रिकेट, फुटबॉलच्या सध्याच्या काळात बऱ्याच लोकांना या ईक्वेस्टेरिअन खेळांच्या स्पर्धेबद्दल माहिती  नाहीये. पण ज्यापलूपमुळं या खेळाबद्दल जागृतीसुद्धा होतेय. अशा प्रकारच्या खेळांमुळं मुलांना नुसताच आपल्या कलागुणांना वाव मिळत नाही, तर त्यांना आपला आत्मविश्वास वाढवण्यास देखील मदत मिळते. 

 

Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.